भावाच्या दीर्घायुष्यासाठी, भरभराटीसाठी भावाच्या राशीनुसार निवडा या रंगाची राखी !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक राशीचा एक भाग्यवान रंग असतो. हा लक्की कलर आपल्यासोबत ठेवला तर ते आपल्यासाठी शुभ राहते. आणि मित्रांनो आता आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की अगदी थोड्या दिवसांमध्ये म्हणजेच 11 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी रक्षाबंधन हा सण आलेला आहे मित्रांनो या दिवशी प्रत्येक घरामध्ये असणारे बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि तिच्या बदल्यात प्रत्येक भाऊ हा आपल्या बहिणीसाठी कोणते ना कोणती भेट वस्तू देतो आणि त्याचबरोबर आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी कायम तत्पर राहू असेही आश्वासन आपल्या बहिणीला देत असतो आणि बहिणीवर येणाऱ्या प्रत्येक संकटात तिची मदत आणि रक्षण करेन असेही वचन देतो.

परंतु मित्रांनो ज्यावेळी बहीण आपल्या भावासाठी राखी आणते त्यावेळी जर त्या बहिणीने आपल्या भावाच्या राशीनुसार आपल्या भावाला राखी आणली आणि ती बांधली तर यामुळे तिच्या भावाला त्याचा नक्की फायदा होईल, तर मित्रांनो अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी भावांच्या लक्की रंगानुसार त्यांच्या मनगटावर राखी बांधली तर ते भावांसाठी शुभ राहते . आज आपण बहिणींनी भावांसाठी राखी निवडताना कोणता रंगाची निवडायची आहे ते जाणून घेऊया.

मेष राशी – ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचा शासक ग्रह मंगळ असतो आणि त्यामुळेच जर तुमच्या भावाची राशी मेष आहे तर त्याच्यासाठी लाल रंगाची राखी निवडणे शुभ असणार आहे. आणि त्यानंतरची राशी आहे वृषभ राशी, मित्रांनो या राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह शुक्र असून . त्यामुळे या राशीच्या लोकांचा शुभ रंग पांढरा मानला जातो. वृषभ राशीच्या भावांसाठी तुम्ही पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची राखी खरेदी करावी .मिथुन राशी – या राशीचा अधिपती ग्रह बुध असून . तसेच, या राशींचा लकी कलर हिरवा असणार आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी मिथुन राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधल्याने भाऊ आणि बहीण दोघांचीही बुद्धी तल्लख असणार आहे .

कर्क राशी – या राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग शुभ मानला जातो. यामुळे या राशीच्या भावांना पांढऱ्या रंगाची राखी बांधल्यास त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळणार आहे. मित्रांनो त्यापुढची राशी आहे सिंह राशी – ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य असून . या राशीचा शुभ रंग लाल किंवा पिवळा आहे. अशा स्थितीत ही राशी असलेल्या भावाला या रंगाची राखी बांधल्यास शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे .

मित्रांनो पुढील राशी आहे कन्या राशी, मित्रांनो या बुध ग्रह कन्या राशीचा अधिपती ग्रह असल्यामुळे अशा स्थितीत त्यांचा शुभ रंग हिरवा राहतो . त्यामुळे कन्या राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधा. असे केल्याने तुमच्या भावाचे प्रत्येक कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. आणि त्याचबरोबर मित्रांनो पुढील राशी आहे तूळ राशी – ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीचा अधिपती ग्रह शुक्र असणार आहे . या राशीच्या भावांच्या मनगटावर बहिणींनी गुलाबी रंगाची राखी बांधा . असे केल्याने भावाच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे .

मित्रांनो पुढील राशी आहे वृश्चिक राशी, मित्रांनो या राशीचा शासक ग्रह मंगळ असून , त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग लाल किंवा मरून आहे. या राशीच्या भावांच्या मनगटावर याच रंगाची राखी बांधा. यामुळे तुमच्या भावाला शत्रूंवर विजय मिळवण्यास यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो पुढील राशी आहे धनु राशी, मित्रांनो या राशीचा स्वामी ग्रह गुरु असल्यामुळे त्यांचा लकी रंग पिवळा किंवा केशरी असून . व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी बहिणींनी आपल्या धनु राशीच्या भावांच्या हातावर पिवळ्या किंवा लाल रंगाची राखी बांधावी.

मित्रांनो पुढील राशी आहे मकर राशी – शनि हा या राशीचा अधिपती ग्रह असून , त्यामुळे त्याचा शुभ रंग निळा किंवा जांभळा आहे. शनिदेवाची कृपा कायम ठेवण्यासाठी बहिणी भावांच्या मनगटावर निळ्या रंगाची राखी बाधा. मित्रांनो पुढील राशी आहे कुंभ राशी, मित्रांनो या राशीचा अधिपती ग्रहही शनि असून . त्यामुळे आपल्या भावाच्या आनंदासाठी बहिणींनी त्यांना जांभळ्या रंगाची राखी बांधावी. आणि मित्रांनो शेवटची रास आहे ती म्हणजे मीन, मित्रांनो या राशीचा अधिपती ग्रह गुरू असून आणि त्यांचा शुभ रंग पिवळा किंवा केशरी आहे. भावाला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर केशरी रंगाची राखी बांधायला हवी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *