11 ऑगस्ट रक्षाबंधन, राखी केव्हा बांधावी? शुभ वेळ कोणती? सर्व माहिती जाणून घ्या!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरु असून श्रावण महिन्यातील दुसरा सण रक्षाबंधन आणि मित्रांनो या वर्षी 11 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी हा रक्षाबंधनचा सण सर्व ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन.

हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाच्या सणाची वर्षभर बहिणी वाट पाहत असतात.

आणि मित्रांनो रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण, या पवित्र सणाची बहिणी वर्षभर वाट पाहत असतात. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच श्रावण महिन्याला साजरा केला जातो. मात्र यंदा तिथीबाबत काही लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. जाणून घेऊया राखी बांधण्याची नेमकी तारीख कोणाती आणि शुभ मुहूर्त कोणता? याबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. रक्षाबंधनासाठी दुपारनंतरचा काळ सर्वोत्तम मानला जातो.

आणि मित्रांनो आपल्या पौराणिक मान्यतेनुसार दुपारची वेळ राखी बांधण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे सांगितले जाते. यासोबतच दुपारी ‘भद्रा’ काळ असेल तर ते शुभ मानले जात नाही. 11 ऑगस्ट 2022 रोजी, प्रदोष काळात भाद्रपुच्छच्या वेळी संध्याकाळी 5 वाजून 18 मिनिटे ते 6 वाजून 18 मिनिटे या दरम्यान रक्षासूत्र बांधू शकता. किंवा भद्राकाळ संपल्यानंतर तुम्ही रात्री 8 वाजून 54 मिनिटे ते 9 वाजून 49 मिनिटे या दरम्यान राखी बांधू शकता. पण परंपरेने सूर्यास्तानंतर राखी बांधली जात नाही. या कारणांमुळे 11 ऑगस्टला राखी बांधण्यापेक्षा 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करणे उत्तम ठरेल.

आणि मित्रांनो रक्षाबंधनासाठी प्रदोष काळचा मुहूर्त 11 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 08:54 ते 09:49 पर्यंत आहे. राखी बांधण्यासाठीही हा काळ योग्य असल्याचे सांगितले जाते. तर 12 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 6 मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी असून, या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही पौर्णिमा तिथी असेल.

या दिवशी भद्राची सावली राहणार नाही. त्यामुळे 12 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरेल. आणि त्याचबरोबर आता सर्वात मोठा प्रश्न अनेकांना पडतो तो म्हणजे कशा पद्धतीने राखी बांधावे आणि राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती आहे आता आपण जाणून घेऊयात की बहिणीने आपल्या भावाला या पवित्र राखी कशा पद्धतीने बांधायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यापूर्वी आंघोळ करून घ्या. आपल्या भावाच्या राशीनुसार रोळी, चंदन, अक्षत, दही, मिठाई, शुद्ध तुपाचा दिवा आणि धागा, रेशीम किंवा कापसाची राखी ताटामध्ये ठेवा. यानंतर तुमच्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला बसवा किंवा उभे करा. यानंतर भावाच्या कपाळाला कुंकाचा टिळा लावून त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र किंवा राखी बांधावी. यानंतर भावाला मिठाई खायला द्यावी तसंच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *