नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला’रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. आणि मित्रांनो श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्र सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो यावर्षी बहिण भावाचा हा सण 11 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी आलेला आहे तर या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते तर मित्रांनो अशावेळी बहिणीने भावाला राखी बांधत असताना जर काही उपाय केले तर यामुळे त्या बहिणीच्या भावाची भरभराट होईल आणि त्याचबरोबर त्यांने हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळेल मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एका उपाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
आणि हा उपाय रक्षाबंधनच्या दिवशी करायचा आहे की ज्यामुळे तुमचा भाऊ खूप अडचणीत असेल, तो खूप कष्ट करतो पण त्याच्यावर आई लक्ष्मीची, महालक्ष्मीची कृपा बरसत नाही, आणि त्याच्या घरात जर सातत्याने गरिबी आहे, तो सतत संकटांमध्ये असेल, कुंडलीमध्ये काहीतरी ग्रह दोष असतील किंवा त्याच्या घरी वास्तूदोष असू शकतात किंवा कोणी जर काही केलेलं असेल ज्याला तुमच्या कुटुंबाची प्रगती बघवत नाही ,तुमचं सुख बघवत नाही आणि मित्रांनो अशा प्रकारच्या बाधा आणि दोष या वस्तूने दूर होणार आहेत आणि याचा अप्रत्यक्ष लाभ बहिणीला सुद्धा प्राप्त होतो.
मित्रांनो आपण हा उपाय आपल्या छोट्या लहान भावासाठी सुद्धा करू शकता, जर तो खुप किरकिर करतो, तुमचा छोटा भाऊ सतत आजारी असेल, तर अशा वेळी नजर लागलेली असू शकते आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आपण रक्षाबंधनाच्या दिवशी शुभमुहूर्तावर आपल्या भावाला ओवाळावे. शुभमुहूर्तावर केलेली कोणतीही गोष्ट फलदायी ठरते. मित्रांनो आज आपण बहिणीने आपल्या भावाच्या रक्षणासाठी आणि त्याचबरोबर प्रगतीसाठी उपाय करायचा आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो हा उपाय करत असताना बहिणीने आपल्या भावासाठी रक्षाबंधनच्या दिवशी केव्हाही 21 वेळा एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे.
बहिणीने भावासाठी राखी बांधल्यानंतर किंवा राखी बांधायच्या आधी देवघरामध्ये बसून देवघरांमध्ये दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर भावाच्या रक्षणासाठी रक्षाबंधनच्या दिवशी देवी देवतांकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या प्रभावी अशा मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “येन बद्धो बलिराजा, दानवेन्द्रो महाबलः तेनत्वाम प्रति बद्धनामि रक्षे, माचल माचलः”
मित्रांनो मंत्र अगदी प्रभावी आहे आणि जर रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने या मंत्राचा जप 21 वेळा केला तर यामुळे तिच्या भावावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपले स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर भगवान शंकर मार्ग काढतील आणि या मंत्राच्या जपामुळे भावाच्या करिअरमध्ये नोकरीमध्ये आणि त्याचबरोबर व्यवसायामध्येही खूप प्रगती होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.