नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो हिंदू दिनदर्शिकेनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या परस्पर प्रेमाचा सण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. एवढेच नाही तर रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष उपाय केल्यास लाभदायक फळ मिळते. मित्रांनो असाच एक छोटासा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण रक्षाबंधनाच्या दिवशी केला तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वाद ही आपल्याला प्राप्त होतील.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय जो आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या लाडक्या स्वामी समर्थांना पहिली राखी बांधायचे आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे आणि रक्षाबंधन दिवशी तर प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते.
परंतु मित्रांनो प्रत्येक घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने मुलीने जर या रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर सर्वात आधी स्वामींना राखी बांधली तर यामुळे स्वामी सदैव आपल्या बहिणीसारखी त्या स्त्रीचे किंवा त्या मुलीचे रक्षण करतील आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सर्वात आधी आपल्या स्वामींना पहिली राखी बांधायची आहे.
तर मित्रांनो ही राखी आपल्याला कशा पद्धतीने बांधायचे आहे याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो ज्या दिवशी पौर्णिमा सुरू होईल त्या दिवशी सकाळची वेळी तुम्हाला ही राखी आपल्या स्वामींना बांधायचे आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधणार आहात त्यावेळी सर्वात आधी देवघरांमध्ये जाऊन आपल्या स्वामींना राखी बांधायचे आहे.
आणि त्यानंतर लगेचच तिथेच देवघरांमध्ये बसून तुम्हाला आपल्या भावाला देखील राखी बांधायचे आहे. तर मित्रांनो आता सर्वांना हा प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने आपल्या स्वामींना राखी बांधायचे आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ताट म्हणजेच आरतीचे ताट आणि राखी साखर किंवा पेढे अशा पद्धतीने तयार करता त्या पद्धतीने तुम्हाला सर्वात आधी ताट तयार करून घ्यायचे आहे.
आणि त्यानंतर हे ताट आपल्याला आपल्या देवघरांमध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरांमध्ये दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण ज्या पद्धतीने आपल्या भावाला राखी बांधत असताना ओवाळतो किंवा त्याला नामाची ओढतो त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मूर्तीला किंवा त्यांच्या प्रतिमेला आपल्याला नामाची ओढून आरतीच्या ताटाणे स्वामींचे औक्षण करायचे आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण भावाच्या डोक्यावर तांदूळ टाकतो.
त्या पद्धतीने स्वामींच्या डोक्यावर सुद्धा किंवा स्वामींची प्रतिमा असेल तर तिच्यावर सुद्धा थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या हाताला तुम्ही राखी बांधू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा असेल तर प्रतिमेच्या जवळ उजव्या बाजूला तुम्ही ही राखी ठेवू शकता.
मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने स्वामींना राखी बांधल्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य असेल तो स्वामींना दाखवायचाच आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यानंतर पेढे किंवा साखर किंवा इतर मिठाई खाऊ घालतात त्याच पद्धतीने स्वामींना सुद्धा काहीतरी गोडधोड पदार्थ करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या स्वामींना राखी बांधली.
तर यामुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून अडचणीतून आणि समस्येतून स्वामी तुमची सख्ख्या भावासारखे रक्षण करतील आणि म्हणूनच येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने किंवा मुलीने आपल्या स्वामी समर्थांना नक्की राखी बांधावी.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.