नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. ही हिरवळ आपल्या मनाला प्रसन्नता वाढते. श्रावण महिन्यामध्ये महादेवांची विशेष पूजा केली जाते. कारण श्रावण महिना हा महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय मंत्र जप केले जातात. त्यामध्ये शिवमुठीला खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवांना शिवमुठ अर्पण केली जाते. या शिवमुठीमध्ये वेगवेगळ्या धान्यांचा समावेश असतो. यामध्ये तांदूळ, तीळ, मूग, जवस या धान्याची महादेवांना शिवमुठ अर्पण केली जाते.
आणि महादेवांच्या सेवेमध्ये शिवमुर्तीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने महादेवांना शिवमुठ अर्पण करावी.दुसरी शिवमूठ आहे तीळ दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमुठ महादेवांना अर्पण केली जाते. तिळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात प्रथिनांच्या साठा खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि तिळाचे सेवन केल्याने महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात बरेच जण श्रावणी धरतात. श्रावणी करणे म्हणजे एक वेळचं जेवण जेवतात. व एक वेळ पूर्णपणे ते लोक उपाशी राहतात. अशा वेळी त्यांच्या शरीराची झीज होऊ नये म्हणून शिवाच्या पिंडीवर मूठभर तीळ वाहिली जाते.
याचा अर्थ असा होतो, की ज्या दिवशी आपला उपवास असतो. त्या दिवशी थोडीशी तीळ आपल्याला खाल्ली पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराची झीज होणार नाही.
त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती आरोग्यासाठी उत्तम आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर महादेवांना बेल पांढरी फुले अर्पण करत असतो. महादेवांना बेल आणि पांढरी फुले खूप आवडतात भारतातील विवाहानंतर मुली सलग पाच वर्षे श्रावण सोमवार करतात.
आपल्या घरी आपला पती व सासू-सासरे चांगले असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ती स्त्री सलग पाच वर्षे श्रावण सोमवार करते. आणि त्यानंतर त्याचे उद्यापन करते. त्याचबरोबर त्या महादेवांच्या मनोभावे पूजा देखील करत असतात. लग्नाच्या आधी देखील बऱ्याच मुली श्रावण मासाचा उपवास करतात. कारण आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा. व आपल्या जोडीदाराकडून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. यासाठी लग्नाआधी देखील मुली श्रावण मासातील उपवास करतात.
आपल्या मनासारखा पती भेटावा यासाठी व्रत करतात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवांचे उपासना केली जाते. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण मासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र जाप पूजा विधी केली जाते. महादेवांना बेल फुले अर्पण करून त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली जाते. त्याचबरोबर शिवमूठ देखील महादेवांना अर्पण केली जाते. शिवमुखीला देखील श्रावण मासा मध्ये खूप महत्त्व आहे. सोमवारच्या दिवशी आपण देखील वाहिली तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.