श्रावण सोमवारी देवघरात दाखवा ‘हा’ नैवेद्य: घरात भरभराट होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो श्रावणातील सोमवारच्या दिवशी हा महादेवाचा अत्यंत मोठा आणि पवित्र दिवस हा मानला जातो. म्हणून आपण या दिवशी उपवास करतो जेणेकरून महादेव आपल्यावर प्रसन्न होतील, त्यांची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या त्या इच्छा पूर्ण करतील, आपल्या अडचणी दूर करतील अशी सगळ्यांचीच इच्छा असते.म्हणून आपण महादेवाचा उपवास या श्रावण सोमवारच्या दिवशी करत असतो परंतु बरेचे भक्त आहेत जे सेवेकरी असतात त्यांना प्रश्न पडतो की या दिवशी आमच्या सगळयाचा उपवास असतो घरी तसं जेवण बनत नाही. पण महादेवाला नैवेद्य काय दाखवावा सकाळी दाखवावा किंवा संध्याकाळी दाखवावा आम्ही तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो मग नैवेद्य काय दाखवावा.

तर मित्रांनो हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी मंदिरामध्ये फक्त दिवा लावून सोडू नये की आम्हचा तर उपवास आहे आम्ही नैवेद्य काय दाखवणार नाही फराळ करू ती ठेऊ असं नाही. महादेवाचा अत्यंत मोठा दिवस आहे म्हणून महादेवावर प्रेम केले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे या दिवसभर आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला पाहिजे.तेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्याल आपल्या घरात शिवलिंग असतं तर तुम्ही त्याच दर्शन घ्या शिवलिंगाची पूजा करा आणि त्यासोबतच वाटीमध्ये थोडेसे दूध घ्या आणि त्यामध्ये साखर टाकून तो नैवेद्य महादेवाला अर्पण करा किंवा ठेवा तर महादेवाला दूध अत्यंत प्रिय असते तुम्ही दूध ठेवलं तर तुमचा सकाळचा नैवेद्य झाला.

आता दुपारी तुम्ही मिठाई आणू शकता जे सफेद रंगाचे असेल सफेद पेढे असतील किंवा सफेद मिठाई असेल ती तुम्ही आणू शकता. मार्केटमधून मिठाई आणणे शक्य नसेल तर तुम्ही पंचामृत बनवून नैवेद्य सुद्धा महादेवालासुद्धा दाखवू शकता त्यासोबतच दुपारी तुम्ही जो फराळ केला असेल तर तो दाखवू शकता किंवा फराळ केला नसेल तर फळं असतील तर तुम्ही फळंसुद्धा दाखवू शकता आणि रात्री आता काय दाखवावं तर रात्री तुम्ही फराळ केला असेल तो फराळ दाखवू शकता त्यासोबत काहीतरी गोड केले असेल तर गोड दाखवू शकता मिठाई असेल तर मिठाई दाखवू शकता किंवा काहीच केले नसेल तर पुन्हा तुम्ही दूध आणि साखर दाखवू शकता कारण दूध महादेवाला अत्यंत प्रिय आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले पाहिजे असे बरेचे कामे आहेत आपण या दिवशी करू शकतो. तसंच एक नैवेद्य आपण या दिवशी महादेवाला जरूर अर्पण करावा आणि तो ही विशेष नैवेद्य असला पाहिजे. आता नैवेद्यमध्ये तुम्ही काय ठेवू शकता आणि केव्हा ठेवू शकता तर या पहिल्या श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी तुम्ही उठलं अंघोळ वगैरे कराल आणि या दिवशी खीर जमत असेल तर खीर करावी, पंचामृत जमत असेल तर पंचामृत करावे किंवा मिठाई आणू शकत असाल सफेद रंगाचीच मिठाई तुम्ही आणावी. कारण सफेद रंग महादेवाला अत्यंत प्रिय असतो. तर प्रयत्न करावे की जो जी पदार्थ द्याल तो सफेद रंगाचा असावा सफेद मिठाई, दूध, खीर किंवा पंचामृत.

तर मित्रांनो असा नैवेद्य तुम्ही या श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या दिवशी दाखवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास सोडाल. तेव्हा म्हणजे तुम्ही उपवास सोडायला बनवले असेल जो स्वयंपाक असेल तो नैवेद्य महादेवाला तुम्ही दाखवू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.