दहा रुपयात मच्छरांचा करा पूर्णपणे बंदोबस्त! हा देशी जुगाड तुम्हाला कोणी सांगणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आत्ता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे आणि आपल्या घरामध्ये अनेक डास फिरत असतीलच आणि त्यामुळे आपल्याला आजारपण देखील येऊ शकतो. ताप, डेंग्यू अशा लहान मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. घरगुती उपाय कशाप्रकारे बनवायचा आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक वस्तूंचा वापर करायचा आहे, त्यातील पहिली वस्तू म्हणजे तुळशी. आपल्या सर्वांना तुळशीचे अनेक फायदे माहिती आहे आणि म्हणूनच आज आपण तुळशीचा उपयोग देखील करणार आहोत.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची पाने लागणार आहेत. तुळशीची पाने सुगंधीत असतात. तुळशी च्या पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जिवाणूंचे संक्रमण कमी होते. प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द होते. तुळशी पानांना कूटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळयातील कफ दूर होतो. जेवढा याचा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळेल तेवढेच आपले घर शुद्ध राहण्यास मदत होते त्यामुळे इथे आपल्याला सर्वप्रथम तुळशीच्या पानांचा वापर करायचा आहे. तुळशीची पाने आपल्या घरासाठी व आपल्या घराच्या परिसरासाठी किती फायदेशीर आहेत आणि मित्रांनो हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरासमोर एक तुळशीचे रोप असते.

मित्रांनो सर्वात आधी आपल्याला वाटीभर तुळशीची पाने घेऊन ती स्वच्छ धुवायची आहे आणि त्यांना मिक्सरला लावून त्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे पाणी देखील वापरायचे आहे. पातळ ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जेणेकरून आपण त्याला गाळून घेऊ शकू पण जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही आहे म्हणजे पाणी जास्त वापरल्यामुळे तुळशीचे जे गुणधर्म आहेत ते कमी होऊ नये एवढ्या प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि जर एक तुकडा वापरत असून तर त्या तुकड्याचा वापर करायचा आहे आणि छोट्या छोट्या वड्या वापरत असून तर त्या वड्या पाच ते सहा घ्यायच्या आहेत.

मित्रांनो आता या कापराची बारीक पूड करून तुळशीच्या पानांच्या लिक्विड मध्ये टाकून एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. जेणेकरून पूर्णपणे एकरूप होण्यास मदत होईल. कापरामुळे कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते. कापूर वातावरणातील हवा शुद्ध ठेवायला मदत करतो आणि नैसर्गिकरित्या कीडे-कीटकांना मारण्यास कापूर फायदेशीर ठरते. त्यामुळे मुंग्या, ढेकूण, डास यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूरचा वापर करा. त्यामुळे आपल्याला इथे कापराचा वापर करायचा आहे. कापूर आपल्या शरीरासाठी जरा ही हानिकारक नसतो त्यामुळे कापूर चा वापर आपण करू शकतो.

आणि मित्रांनो आता हे बनवून झालेले लिक्विड आपल्याला कोणत्याही इलेक्ट्रिक कॉईलच्या खाली कंटेनर मध्ये भरून आपण याचा वापर करू शकतो आणि संध्याकाळी जसे आपण इलेक्ट्रिक कॉइल चे बटन चालू करतो आणि ती कॉइलच्या प्रमाणे काम करते तशीच किंवा त्यापेक्षाही जास्त फायदेशीर ठरणार आहे तो म्हणजे हा उपाय आणि यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही त्यासोबतच डास काही क्षणांमध्येच मरतील व परत कधीही येणार नाही. या उपायाचा वापर केल्यामुळे घरामध्ये एक सुगंध देखील दरवळत राहील आणि यापुढे आपल्याला जास्त खर्च करण्याचा देखील गरज पडणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *