नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे. भगवान शिवला श्रावण महिना खूप प्रिय आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी भक्त वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात. यात श्रावण सोमवारच्या व्रतालाही विशेष महत्त्व आहे. या व्रत दरम्यान भगवान शंकराची विधीवत पूजा आणि या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले जाते. शिव पूजेत बेलपत्राचे एक वेगळे स्थान आहे. असे म्हणतात की श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा संपन्न होत नाही. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यासाठी काही नियम आहेत. या नियमांचे पालन करत पूजा व बेलपत्र अर्पण केल्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होत भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
भगवान शंकर यांना देवांचे देव म्हणून ओळखले जाते. भोळा शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साद घालतात. महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावे प्रत्येकासाठीच शक्य आहे. त्यामुळेच तर हिंदू पुराणातील कथेनुसार, ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले आहे. त्यांपैकी एक आहे रावण, रावण राक्षस असला तरी तो शिव भक्त होता. भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत, म्हणून मनुष्य देखील अनेक प्रयत्न करतात. तसेच ते सोमवारी भगवान शिवची विधिवत पूजा देखील करतात.
आणि त्याचबरोबर मित्रांनो भगवान शंकराच्या पूजेमध्येही शिवलिंगाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. आणि मित्रांनो असे मानले जाते की, शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत उपाय करत असताना मित्रांनो आपल्याला श्रावण सोमवार मधल्या कोणत्याही गुरुवारच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी आपल्या घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवांना आवडणाऱ्या आणि त्यांना प्रिय असणाऱ्या अशा पाच गोष्टी आपल्याला या दिवशी शिवलिंगावर करायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण सोमवारच्या किंवा गुरुवारच्या दिवशी घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या शिवलिंगावर या पाच वस्तू अर्पण केल्या तरी यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील.
चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कोणत्याही त्या पाच वस्तू ज्या आपल्याला सोमवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी आपल्या घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती, तर मित्रांनो आपल्याला सोमवारच्या किंवा गुरुवारच्या दिवशी आपल्या घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये या वस्तू घेऊन जायचे आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला सर्वात आधी जाऊन भगवान शिव शंकरांच्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंग जवळ जाऊन भगवान शंकरांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर या वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत.
तर मित्रांनो या पाचही वस्तू भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत आणि त्याचबरोबर या सर्व वस्तू शंकरांना प्रिय असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत आणि म्हणूनच आपण याच वस्तू भगवान शंकरांना श्रावण महिन्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही सोमवारी किंवा गुरुवारच्या दिवशी शिवलिंगावर जाऊन अर्पण करायचे आहेत तर मित्रांनो त्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत, मित्रांनो यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे पांढऱ्या रंगाचे कोणतेही फुल तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे पांढरा धागा किंवा पांढऱ्या रंगाचा पूजेचा दोरा तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे मिठाई.
मित्रांनो तुम्हाला जी मिठाई शक्य होईल ती मिठाई तुम्हाला भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचे आहे परंतु मित्रांनो ही मिठाई शक्यतो पांढऱ्या रंगाची असावी आणि त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान शंकरांना श्रावण महिन्यात दुधाचा अभिषेक घातला जातो आणि भगवान शंकरांना सुद्धा दूध हे अत्यंत प्रिय आहे म्हणूनच मित्रांनो आपल्याला सुद्धा शिवलिंगावर थोडेसे दूध अर्पण करायचे आहे आणि त्यानंतरची पाचवी आणि शेवटची वस्तू म्हणजे पांढरे किंवा सफेद रंगाचे वस्त्र तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने या पाच वस्तू जर तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जाऊन शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण केल्या तर यामुळे भगवान शंकर तुमच्यावर लगेच प्रसन्न होतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.