तरुण दिसण्यासाठी ‘हे’ तीन पदार्थ रोज खा, कधीही म्हातारे दिसणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो, आत्ताच्या या आधुनिक जगात प्रत्येकाला तरूण दिसायचाच आहे तरूण रहायचंय आहे. टीव्हीवर जाहिरातीमधून मॉडेल्सचा चेहरा केस बघून सगळेच जण त्या करत असलेल्या कॉस्मेटिक्स च्या मोहात पडतात. ही कॉस्मेटिक्स खूप महाग असतात प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे नाही. शिवाय ही कॉस्मेटिक्स वापरून प्रत्येकाला फायदा होतोच असे नाही. काहीजणांना याचे दुष्परिणामही भोगावे लागतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपले केस लांब काळेभोर चमकदार करण्यासाठी तसेच आपली त्वचा तुकतुकीत तजेलदार करण्यासाठी नेहमी तरुण राहण्यासाठी एक घरगुती जादू तुम्हाला सांगणार आहे आणि शिकवणारी आहे.

मित्रांनो, आपल्या पुर्वजांच आरोग्य आणि आयुष्य हे त्यांच्या आहारात दडलेल आहे. निरोगी आयुष्य हे त्यांच गुप्त म्हणजे त्यांचा आहार जसा आहार तस त्याचं आरोग्य आयुष्य आणि तारुण्य. जर तुमचा आहार योग्य असेल, तर तुम्ही सतत चिरतरुण दिसू शकतात. निरोगी आयुष्य जगू शकतात यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले असे तीन पपदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत,आणि जर मित्रांनो, हे पदार्थ जर तुम्ही दररोज खाल्ले म्हणजे उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो हे पदार्थ जर तुम्ही प्रमाणामध्ये दररोज खाल्ले तर तुम्ही नेहमीच तरुण रहाल. तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणार नाहीत आणि तुमची त्वचा ही तजेलदार राहील.

मित्रांनो जे तीन पदार्थ आहेत त्यातील पहिला पदार्थ हे लिंबू. लिंबू म्हणजे विटामिन सी चा सर्वात मोठा स्रोत आहे. लिंबू आपल्या डॅमेज झालेले सेल्स असतात. त्या सेल्सना रिपेअर करण्याचे काम लिंबू करतो. आपल्या रक्तामध्ये लोह शोषून घेण्यासाठी लिंबू फार मदत करतात. त्याच प्रकारे रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप चांगलं होतं,आणि मित्रांनो रक्ताभिसरण चांगल झाल्यामुळे जी पोषक द्रव्ये असतात. ती प्रत्येक पेशीपर्यंत अगदी सहज पोहोचतात त्यामुळे चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर ते कमी होतात. भरपूर पाणी पित रहा यामुळे सुरकुत्या पडणार नाही आणि त्वचा नेहमी ताजीतवानी दिसेल.

मित्रांनो आपण लिंबूचे सेवन लिंबू पाण्यामध्ये पिळून पिऊ शकता. सरबत करून पिऊ शकता तसेच वरण-भातावर लिंबू पिळून खाऊ शकता. सर्वात सोप म्हणजे लिंबू पाणी. यामुळे मेटाबोलिजमची प्रक्रिया फास्ट बनते त्यामुळे आहारामध्ये आपण जे काही खाऊ त्याचे पचन चांगल्या प्रकारे होतं. म्हणूनच लिंबूचे आपण दररोज आपल्या आहारात समावेश करायला हवा तसेच लिंबूरस आपण चेहऱ्यावर पंधरा-वीस मिनिट लाऊन चेहरा धुतला तरी चेहरा एकदम स्वच्छ मऊ मुलायम होतो आणि चेहऱ्यावर पिंपल्स डाग असतील तर निघून जातील.

दुसरा पदार्थ आहे अक्रोड. अक्रोड मध्ये ओमेगा-3 ओमेगा सिक्स हे घटक असतात. अक्रोड मधे विटामिन सी आणि इतर पोषक तत्त्वाचा मोठा स्रोत आहे. अक्रोड मधे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. त्यामुळेच त्वचा, केस यांचा संरक्षणामुळे होतं. पेशींना ऊर्जा पोचविण्याचे काम अक्रोड करतात तसेच सूर्यापासूनची अल्ट्रा व्हॉयलेट किरणं आपल्यापर्यंत येतात या अल्ट्रावायलेट घातक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण सुद्धा हे अक्रोड करतात.

मित्रांनो, नवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी अक्रोड खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या शरीरात रोज प्रत्येक क्षणाला नवीन पेशी निर्माण होत असत पेशी कालांतराने नष्ट होत असतात आणि त्या जागी नवीन पेशी निर्माण होत असतात. नवीन पेशी निर्मितीचा वेग कमी होतो त्यावेळी आपण म्हातारे दिसू लागतो. तर हा वेग वाढविण्याचा काम अक्रोड करतं. यासाठी आपण दररोज दोन ते तीन अक्रोड खायला हवेत. त्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल. केस घनदाट णि काळेभोर बनतील. तसेच आपली त्वचा सुद्धा मुलायम बनेल आणि आपली हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा आहे अक्रोड खूप चांगले.

मित्रांनो, तिसरा पदार्थ आहे रताळी. दसरा आला कि बाजारात रताळी दिसू लागतात रताळी बीटा कॅरोटीनयुक्त असतात. त्यामुळे आपल्या केसांना त्वचेला आणि नखांना पोषण देण्याचं काम ही रताळी करत असतात. मित्रांनो, बीटा कॅरोटीन बरोबरच याच्यामध्ये आयटीआय सीड्स ओमेगा-तीन विटामिन ए बी सी डी अशी जवळजवळ सर्व प्रकारची विटामिन्स रताळात मध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून हा पदार्थ सुद्धा अतिशय चांगला आहे तुमच्या पेशींची वाढ करण्यासाठी.

मित्रांनो आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल अशी सतत निर्मिती होत असते आणि आपलं शरीर म्हातारे करण्यास कारणीभूत घटक कोणता असेल तर तो म्हणजे फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्सना रोखण्याचं काम त्यांना नष्ट करण्याचं काम अँटिऑक्सिडंट करतात आणि अँटिऑक्सिडंट आपल्याला रताळ्या पासून भेटतात. म्हणून रताळी आपण दररोज खायला हवीत. रताळात फ्री रॅडिकल्स रोखण्यास मदत करतात त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत, केस गळती होत नाही आणि आपण सतत तरुण ताजेतवाने दिसतो.

तर मित्रांनो लवकर म्हातारपण यायला नको असेल, कायम तरुण राहायचं असेल तर तुम्ही सुद्धा लिंबू अक्रोड आणि रताळ हे सहजपणे मिळणारे तीन पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. जसा आहार तसं त्याचं तारुण्य हा मंत्र लक्षात ठेवा. तसेच योगासने प्राणायाम फिरणे अशा व्यायामाची जोड द्या.

वरील माहिती स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *