नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो कोणत्याही श्रावण सोमवारी आपल्या घरामध्ये करा. ही पूजा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि महादेव आपल्यावर जी काही संकटे दुःखे आलेली आहेत. ती सर्व दूर करतील श्रावण महिना सुरू झालेला आहे. आणि पहिला सोमवार देखील झाला आहे. आणि अजून सोबत शिल्लक आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही एका श्रावण सोमवारी किंवा इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्या घरामध्ये जर ही पूजा केली तर आपले सर्व दुःख दूर होतील. आणि आपल्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष सेवा केल्याने त्याची विशेष लाभ होतात. कारण श्रावण महिना हा महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. आणि या महिन्यांमध्ये आपण महादेवांची जी काही सेवा करू त्याचे फळ महादेव आपल्याला लगेच देतात.
आजच्या या लेखामध्ये आपण अशी एक पूजा आहे. त्या पूजेची आपण माहिती घेणार आहोत. ही पूजा आपल्याला सोमवारच्या दिवशी करायची आहे. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी ही पूजा केली तरी चालते किंवा ज्यांना प्रत्येक सोमवारी ही पूजा करणे शक्य नाही. त्यांनी श्रावण महिन्यातील कोणत्याही एका सोमवारी ही पूजा केली तरी चालते.
श्रावण सोमवारच्या दिवशी आपण जी पूजा करणार आहोत ती पूजा साधी आणि सोपी आहे. आणि ही पूजा करण्यासाठी आपल्याला कोठे मंदिरात किंवा इतरत्र कोठेही जावे लागणार नाही. आपल्या घरामध्येच आपण ही पूजा करणार आहोत.
ही पूजा करण्यासाठी आपल्या घरामध्ये एक शिवलिंग असायला हवे. हे शिवलिंग प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच जर आपल्या घरामध्ये हे शिवलिंग नसेल तर आपण ही पूजा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकतो. आपण जे पूजा करणार आहोत ही पूजा सोमवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकता.
तुम्ही जर ही पूजा आपल्या घरामध्येच करणारा असाल तर एका ताटात ताम्हण शिवलिंग ठेवायचे आहे. शिवलिंग ताटामध्ये किंवा सामनामध्ये ठेवल्यानंतर सगळ्यात पहिला दुधाचे 11 चमचे घालून दुधाचा अभिषेक शिवलिंगाला घालायचा आहे. शिवलिंगला दुधाचा अभिषेक करत असताना अकरा वेळेस ओम नमः शिवाय असे आपल्याला म्हणायचे आहे. ‘ओम नमः शिवाय’ म्हणायचे. आणि एक चमचा दूध शिवलिंगावर अर्पण करायचे अशा पद्धतीने शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण दुधाचा अभिषेक घातलेला आहे. त्याच पद्धतीने पाण्याचा देखील अभिषेक शिवलिंगाला घालायचे आहे.
दुधाप्रमाणेच अकरा चमचे पाण्याने शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे. आणि त्यावेळी देखील 11 वेळेस ओम नमः शिवाय असे म्हणायचे आहे. दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक घालून झाल्यानंतर ते शिवलिंग आपल्या हातामध्ये उचलून घ्यायची आहे. आणि स्वच्छ पाण्याने पुन्हा ते शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचे आहे. आणि स्वच्छ कापडाने पुसून शिवलिंग देवघरामध्ये आहे. त्या ठिकाणी ठेवायचे आहे. शिवलिंग देवघरामध्ये ठेवल्यानंतर अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा शिवलिंगाला लावायचा आहे. बेल पांढरी फुले शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत. आणि नैवेद्यासाठी पांढरी मिठाई आणायची आहे.
आपल्याला पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवायला जमत नसेल तर दूध आणि साखर ठेवले तरी चालते. दूध साखर ठेवून झाल्यानंतर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवल्यानंतर, आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ जप करायचा आहे. यानंतर महादेवांचे कोणतेही पारायण त्यांचा कोणताही जप किंवा त्यांची इतर कोणतीही सेवा करायची आहे. अशा पद्धतीने श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरच्या घरी आपण सेवा करू शकतो. ही पूजा जर आपण केली तर महादेव आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्यावर कोणतेही दुःख येऊ देणार नाही. आणि सर्व इच्छा पूर्ण करतील.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला