नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आता श्रावण महिना सुरु झाला आहे. प्रत्येक जण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा तसेच त्यांना अभिषेक घालण्यात मग्न असतात. महादेवांचे मंदिर भक्तांनी फुलून गेले आहेत. फक्त महादेवाची पूजा करून आपली इच्छा पूर्ण होत नसते. त्यामुळे नंदी महाराजांची देखील पूजन करावे लागते. मगच महादेवांचे दर्शन होते आणि महादेवाने त्यांना असे वरदान देखील दिलेले आहे.
नंदी महाराज हे महादेवांचे दूत देखील आहेत जर आपण आपल्या मनातील कोणतीही च्या नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितले तर ते महादेवान पर्यंत पोहचवण्याचे काम करतात. याविषयी एक पौराणिक कथा देखील आहे श्री लाभ नावाचे ब्रह्मचारी मुनी होते. एके दिवशी ते रानात गेले असताना त्यांना तेथे एक लहान मुले रडताना दिसले त्यांनी इकडे तिकडे पाहिले की त्या मुलाबरोबर कोण आले आहे. का तर तसे त्यांना काहीच दिसले नाही. ते मुल एकटेच होते व ती खूप रडत होते.
त्यांनी त्या मुलाला आपल्याबरोबर आपल्या आश्रमात घेऊन आले. व त्याचे संगोपन आपल्या मुला प्रमाणे ते करू लागले व ते त्या बालकास नंदी या नावाने बोलू लागले. ते बालक आता हळूहळू मोठे होऊ लागले होते. एकदा त्या मुलीच्या आश्रमामध्ये दोन साधू आले. व ते साधू त्या मुलाकडे पाहून मुनीला म्हणू लागले. की हे बालक खूपच हुशार आहे. पण हे बालक अल्पायुषी आहे त्याचे मरण जवळ आले आहे.
जास्त दिवस हे बालक जगू शकणार नाही. हे त्या बालकास समजल्यानंतर ते बालक खूप रडू लागले. व त्याने रानात जाऊन महादेवाची घोर तपस्या करण्यास सुरु केले. ओम नमः शिवाय याचा जप तो करत होता. त्या बालकाच्या या तपश्चर्येने महादेव खुश झाले. व प्रकट होऊन त्याला अमर होण्याचा आशीर्वाद दिला. व त्या बालकास आपल्या बरोबर घेऊन गेले. महादेवांनी व पार्वतीने आपल्या सर्व गणान समोर नंदीला सर्व गुणांचा अधिपती म्हणून अभिषेक केला.
व त्यावेळी त्यांनी असा आशीर्वाद दिला. की ज्या ज्या ठिकाणी महादेव असतील त्या त्या ठिकाणी नंदी हे असणारच. नंदी शिवाय महादेवाचे कोणतेही मंदिर पूर्ण नाही. आणि जे जे भक्त नंदीच्या कानामध्ये आपल्या इच्छा सांगतील, त्या सर्व इच्छा त्यांच्या लवकर पूर्ण होतील. असा आशीर्वाद त्यांनी त्यावेळी नंदीला दिला. आपण महादेवांना आपली इच्छा सांगू शकतो. पण आपली इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी आपण जर नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा लवकर पूर्ण होते.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.