शिवमुठ म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे ? जाणून घ्या अत्यंत महत्त्वाची माहिती !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या आरोग्याला उत्तम गुणांचे दान देणारी ही शिवामूठ आपल्यातील सर्वोत्कृष्ट वस्तूंचे दान करण्याची परंपरा ही भारतीय परंपरा आहे. आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये म्हणूनच शंकराला आपल्या आहारातील सर्वतोम असणारे तांदूळ, तीळ, मुग, जवस यांची शिवामूठ श्रावण महिन्यामध्ये मोठ्या श्रद्धेने वाहिली जाते.

शिवामूठ घालत असताना आपल्या मुटीतील सर्वोत्तम धान्यांचा विचार आणि आचार व्हावा हा शिवामूठ मागील मुख्य नियम आहे. वृत्त घेऊन आलेला श्रवण हा श्रद्धा आणि भक्तीचे एक पर्व आहे. शिव म्हणजे ‘शुभ’ आणि याची सुरुवात श्रावणी सोमवार पासून होते. या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून शंकरांची उपासना केली जाते. आणि या दिवशी तांदूळ, तीळ, मूग, जवस यांच्या मुठी शंकरांना वाहतात.

शिवमुर्ती मध्ये केलेले धान्याचे दान हे खऱ्या अर्थाने धान्याचे दान केले आहे. असे मानले जाते आणि श्रावण महिन्यामध्ये असणाऱ्या वातावरणामध्ये हे धान्य खाण्यास उत्तम आहेत. श्रावण महिन्यामध्ये अनेक भाज्या खाने बंद झालेले असते. आणि ज्या व्यक्ती श्रावण महिन्यातील व्रत करतात त्यांच्या शरीराला आवश्यक असे असणारे घटक मिळत नाहीत.

म्हणूनच शिवमुठीच्या माध्यमातून ही युक्ती पूर्वजांनी केली असेल श्रावण महिन्यामध्ये भाज्या खायच्या नाही. तर मग काय खावे असा प्रश्न निर्माण होतो. आणि अशावेळी प्रथिने युक्त असणारे तांदूळ तीळ मूग जवस ही धान्य आपल्या शरीरास प्रथिने पुरवतात. आणि आपले आरोग्य चांगले ठेवतात आपल्याकडे शरद ऋतू मध्ये नवीन धान्य तयार होते.

आपण शिवमूर्तीसाठी जे धान्य वापरणार आहोत. ते धान्य जुने धान्य वापरलेले असते. जुने धान्य पचनासाठी हलके असतात म्हणूनच शिवमुठ घालत असताना आपले पूर्वज जुन्या धान्याचीच शिवमुठ घालत होते. पावसाळ्यामध्ये शरीरातील अग्नी दुर्बल झालेली असते. म्हणूनच पचना संदर्भातील अनेक अडचणी तयार होतात. म्हणूनच जुनी धान्य खाने कधीही आपल्या शरीरासाठी चांगले असते. जे जे देवाला आपण देतो ते सर्व भक्तांना देखील चालते.

असा एक समज आहे. वर्षा ऋतुतील धान्यामध्ये शिवमुठीमध्ये धान्यांचा समावेश करावा. हा आरोग्य विषयक सल्ला श्रावणी सोमवारातून दिलेला असावा. श्रावण महिन्यामध्ये उपवास करत असताना. साबुदाणा आणि शेंगदाणे यांच्यापासून तयार झालेले फराळी पदार्थ शक्यतो टाळावेत.

शिवमुठीसाठी आपण जे धान्य ते धान्य आपल्या शरीरासाठी चांगले. असते शंकराला तांदूळ तीळ मूग धान्य ही चार धान्य अर्पण करत असताना या चार धान्यांचा विचार आणि आचरण आवश्यक व्हायला हवे. आपल्याकडे शरद ऋतू मध्ये मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन होते. आपले पूर्वज साधारणता दिवाळीच्या कालावधीमध्ये भरपूर धान्य खरेदी करून ठेवतात.

आणि ते धान्य पावसाळा येईपर्यंत जुनी होतात. आणि पावसाळ्यामध्ये जुन्या झालेल्या धान्यांचा वापर करावा. या हेतूने आपण ते धान्य साठवून ठेवलेले असते. जुने धान्य खाण्यास ते पचण्यास हलके असतात. या उद्देशाने ती धान्य साठवून ठेवलेली असावीत. आणि असे हलके अन्न आपल्या शरीरासाठी चांगले असते. हे आपल्या आयुर्वेदिक शास्त्राचे नियम आहेत.

तांदूळ हा आपल्या आहारातील खरोखरच महत्त्वाचा घटक आहे. तांदळाच्या सेवनाने आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात पोलीस केलेला तांदूळ आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. म्हणूनच बिगर पॉलिश केलेला तांदळामध्ये जीवनसत्व ‘अ’ व ‘ब’ मोठ्या प्रमाणात असतात तांदळामध्ये जे घटक आहेत. ते आपल्या शरीराला सहज पचवता येतात.

भारतामध्ये पांढरे काळे आणि तपकिरी अशा तीन रंगांच्या तीळ मिळतात काळे तीळ औषधांमध्ये वापरले जातात. व पांढरे तीळ तेल काढण्यासाठी वापरले जातात. तेलामध्ये स्निग्धता असते. दोन बाजू स्निग्धतामुळे एकमेकांना जोडले जातात. म्हणूनच वात विकारासारख्या आजारावर तीळ हे एक औषध उत्तम आहे. तिळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात.

उपवासाला मूग चालतात मूग हे पचायला हलके असतात. मुग प्रथिने मोठ्या प्रमाणात पुरवतो त्यामुळे आपल्या शरीरास बळ मिळते. मुग उष्ण नाही. त्यामुळे दैनंदिन आहारामध्ये मुगाचे सेवन केल्यास त्याचा फायदा आपल्या शरीराला चांगला होतो मूग खाल्ल्याने आपल्या डोळ्याचे आरोग्य सुधारते असे मानले जाते. पावसाळ्यातील उत्तम आहार म्हणून शिवमुठीमध्ये मुगाला मुख्य स्थान दिलेले आहे. पांढऱ्या व निळ्या फुलांची जवस या दोन जाती आपल्या भारतामध्ये आढळतात. जवस या धान्याची शेती बंगाल व बिहार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. माशापासून मिळणारे तेलाचे फायदे हे आपल्याला जवसापासून मिळतात. म्हणूनच शाकाहारी लोक जवसाचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. जवस खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील चरबीचा अंश पाण्यासारखा वितळतो.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *