नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो श्रावण महिना सुरू झालेला आहे. आणि पहिला श्रावण सोमवार एक ऑगस्ट रोजी येत आहे. पहिल्या सोमवारपासून दररोज महादेवांची ही विशेष सेवा करा. रोज विशेष मंत्राद्वारे महादेवांना प्रसन्न करून घ्या. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि आपल्या घरामध्ये भरभराटी सुख समाधान समृद्धी येईल मित्रांनो एक ऑगस्ट पासून म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून हा मंत्र दररोज म्हटला तर महादेवांना आपण प्रसन्न करून घेणार आहात. हा मंत्र आपल्याला आपल्या घरामध्येच राहून देवघरासमोर दररोज म्हणायचं आहे.
श्रावण महिना सुरू झालेला आहे. आणि हा श्रावण महिना महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये महादेवांची विशेष प्रकारे सेवा केली जाते. आणि महादेवांना प्रसन्न करून घेतले जाते. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रांचा जप केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा देखील केल्या जातात. महादेव हे भोळे महादेव आहेत ते आपल्या सेवेने लगेच प्रसन्न होतात. व आपल्या भक्तांना फळ देखील लगेच देतात. त्याचबरोबर महादेवांना बेलपत्र व फुले देखील अर्पण केले जातात.
आणि महादेवांची कृपा आपल्यावर करून घेऊ शकता आपल्याला फक्त 21 वेळेस किंवा 108 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजेच काय तर संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आपल्याला संपूर्ण एक माळ जप करणे शक्य नसल्यास कमीत कमी 21 वेळा तरी या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. महिला पुरुष किंवा विद्यार्थी वर्गाने जरी हा मंत्र जप केला तरी चालतो. किंवा घरातील एखाद्या सदस्याने या मंत्राचा जप केला तरी चालतो. घरातील एखाद्या व्यक्तीने जरी या मंत्राचा जप केला तर याचे फळ संपूर्ण कुटुंबाला मिळते.
आपल्याला या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळी आपण आपली देवपूजा करतो, त्यावेळी म्हणायचं आहे. देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे. आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्रजापासोबतच आपली जी रोजची नित्यसेवा आहे. ती नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे. श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारपासून ते श्रावण महिना संपेपर्यंत आपल्या ज्या नेहमीच्या सेवा आहेत. त्या सेवेबरोबरच आपल्याला ही देखील महादेवांची विशेष
सेवा करायची आहे.
आपण जो मंत्र म्हणणार आहोत, तो मंत्र महादेवांच्या अष्टनामावली मधील एक मंत्र आहे. या नामावलीला शिवनामावली असे देखील म्हणतात तो मंत्र असा आहे. ‘ओम महेश्वराय नमः’ हा मंत्र आपल्याला कोणतीही काही न करता एकदम हळुवारपणे या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळा किंवा 108 वेळा करायचा आहे. हा मंत्र खूप चमत्कारी व प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने महादेवांची कृपा आपल्यावर होणार आहे. या मंत्राचा जप जर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर महादेवाची कृपा आपल्यावर होईल.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.