नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो नशिबाचे खेळ हे फार विचित्र असतात. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. हे काय आपल्याला वेगळे सांगायला नको कारण नशीब राजाला रंग बनवते तर रंकाला राजा कधी बनवेल हे कोणालाही सांगता येत नाही. कारण बदलत्या गृह नक्षत्रांचा प्रभाव मानवांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे पडत असतो. गृह नक्षत्रानुसार ज्यावेळी ग्रहांची स्थिती नकारात्मक असते. त्यावेळी त्याचा वाईट परिणाम मनुष्यांच्या जीवनावर पडत असतो. नकारात्मक ऊर्जा मनुष्याच्या प्रगतीमध्ये अनेक बाधा निर्माण करतात. आणि अशा काळामध्ये मनुष्याला यश मिळणे खूप कठीण असते.
त्याचप्रमाणे सकारात्मक ग्रहांची दशा ज्यांच्या वर आहे. त्यांना याचा फायदा खूप असतो. ज्यांच्यावर सकारात्मक ग्रहांची दशा रोड पतीला देखील करोडपती बनवते दिनांक एक ऑगस्ट पासून सकारात्मक आणि शुभ असा अनुभव काही भाग्यवान राशींच्या नशिबात येण्याचे योग आहेत. या राशींच्या आयुष्यातील वाईट ग्रहांची दशा नष्ट होऊन सकारात्मक कार्याची दिशा यांच्या वाटेला येणार आहे. या राशींसाठी प्रगतीच्या सर्व वाटा मोकळ्या होणार आहेत. हा काळ यांच्यासाठी खूप प्रगतीचा असणार आहे. आर्थिक संबंधी असणाऱ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. नशिबाला भाग्याची साथ मिळणार आहे.
मेष राशीसाठी हा काळ खूप भाग्यशाली असणार आहे बुध ग्रह मेष राशीच्या पाचव्या स्थानामध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे हा काळ मेष राशीसाठी खूप चांगला असणार आहे. या काळामध्ये आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होणार आहेत. जी कामे अडकलेली आहेत, ती कामे देखील या काळामध्ये पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ खूप अनुकूल असणार आहे. विद्यार्थी वर्गाला परीक्षेमध्ये चांगले यश मिळणार आहे. उद्योग व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये आपल्याला भरपूर यश मिळणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. संतती प्राप्तीसाठी ज्या काही समस्या आहेत. त्या समस्या या काळामध्ये दूर होणार आहेत.
मिथुन राशीसाठी देखील हा काळ खूप शुभ आणि प्रभावशाली असणार आहे. बुध ग्रहाचे सिंह राशीमध्ये होणारे परिवर्तन मिथुन राशीसाठी खूप प्रभावशाली असणार आहे. या काळामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. आपली प्रगती होणार आहे. बुध ग्रहाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या नकारात्मक गोष्टी नाहीशा होऊन सकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंदी वातावरण राहणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी एक ऑगस्टपासून येणारा पुढील काळ खूप शुभ फळ देणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्या यामुळे दूर होणार आहेत.
कर्क राशी बुध ग्रहाचे सिंह राशीमध्ये होणारे परिवर्तन कर्क राशीसाठी खूप लाभदायक असणार आहे. कर्क राशीच्या दुसऱ्या भागामध्ये बुध ग्रह प्रवेश करणार आहे. हा काळ कर्क राशीसाठी खूप लाभदायक आहे. आपली वाणी मधुर होणार आहे. आपली वाणी मधुर असल्यामुळे लोक आपल्या वाणीमुळे प्रभावित होतील. आपल्या शब्दाला किंमत मिळेल एक ऑगस्ट पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या आर्थिक समस्या सर्व दूर होणार आहेत. पैशाची आवक वाढणार आहे. त्याचबरोबर कमाईच्या साधनांमध्ये वाढ होईल. नोकरी मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आपले यशस्वी ठरतील बेरोजगार दारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. कर्क राशीसाठी हा काळ वरदान समजायला हरकत नाही. आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होणार आहे.
कन्या राशि बुध राशीचे सिंह राशीमध्ये होणारे परिवर्तन कन्याराशीसाठी खूप लाभदायी असणार आहे. इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये सर्व सकारात्मक गोष्टी घडतील. एक ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करून देणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टिकोनातून हा काळ खूप सुखद ठरणार आहे आपली आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत. त्या समस्या दूर होतील. बुद्धीला सकारात्मक चालना मिळणार आहे. बुद्धीचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या यश प्राप्त करून घेणार आहात.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.