पोटात वारंवार गॅस होणे, पाद येणे, अपचन, पोट गच्च होणे यावर घरगुती रामबाण उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना पोटामध्ये वारंवार गॅस निर्माण होणे, पोट साफ न होणे, पोट गच्च राहणे, वारंवार पिंढरीला पायाला गोळे येणे, रक्ताची कमतरता असणे, हिमोग्लोबिन कमी झालेले असेल, वारंवार अशक्तपणा थकवा कमजोरी जाणवत असेल तर अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि शिवाय हा उपाय आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो आणि हा उपाय करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोणतेही औषध, गोळी, चूर्ण घ्यायची गरज लागणार नाही. हा उपाय रात्री झोपताना केल्यास सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला कंट्रोल होणार नाही.

पोट लगेच दोन मिनिटात साफ होईल असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. लहान मुले असो किंवा वयस्कर व्यक्ती या सर्वांना ही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो, हो नियमित जेवण, अवेळी जेवण,अवेळी झोप, अपुरी झोप अशा विविध करणारे तसेच तेलकट-तुपकट तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे या कारणामुळे अपचन, गॅस ,एसिडिटी, भूक न लागणे, पोट सारखं गच्च वाटणे अशा समस्या होऊ लागतात. या समस्येसाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत.

ही समस्या सुरु झाली की आपली भुक हळूहळू कमी होऊ लागते. पोट गच्च होणे, पोट जड होणे, खायची इच्छा न होणे तोंडाला चव नसणे, थोडे जरी खाल्ले तरी पोट ग’च्च होणे, गॅसेस ,अपचन, पित्त अशा विविध समस्या सुरू होतात आणि त्याचबरोबर मित्रांनो भूक न लागणे काहीही खाण्याची इच्छा न होणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे जड होणे या समस्येतून मुक्त होण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. जो अतिशय सोपा आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत चला तर पाहूया काय आहेत उपाय.

मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्या पोटासंबंधी सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी, जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय घेतले पाहिजे. ज्यामुळे आपल्या पोटासंबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपण २ चमचे जिरे, ३ चमचे धने आणि २ चमचे बडीशेप घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिक्स करा. हे गॅसवर वीस मिनिटे उकळूद्या आणि गरमा-गरम प्या. यामुळे आपल्या पोठा संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्याच बरोबर सकाळच्या वेळी आपले पोटही साफ होईल.

मित्रांनो जिरेमध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक ॲसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक ॲसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. जिरे केवळ व्हिटॅमिन ई भरलेले नाही तर त्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात.

बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत. बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. म्हणुनच मित्रांनो हा छोटासा सोपा येतो मी तुमच्या घरामध्ये करून पोटा संबंधित सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न नक्की करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *