श्रावण महिन्यात पारायण केल्याने दुप्पट लाभ होतात ! परंतु कोणते पारायण करावे? कधीपासून करावे?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो श्रावण महिन्यामध्ये पारायण केल्याने त्याचे लाभ दुप्पट होतात. हे काहींना माहीत असेल तर काहींना माहीत नसेल श्रावण महिन्यामध्ये कोणते पारायण केल्याने त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते ते पारायण श्रावण महिन्याच्या कोणत्या दिवसापासून सुरू करायचे आहे. ते कोणते पारायण करायचे आहे. याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. शास्त्रानुसार श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो असे मानले जाते. की श्रावण महिन्यामध्ये आपण देवी देवतांकडून जे काही मागू ते सर्व आपल्याला मिळते. देवांची दारे श्रावण महिन्यामध्ये उघडी असतात असे आपल्याला आपल्या वारवडलांनी सांगितलेले आहे.

मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. की श्रावण महिना खूप पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. आणि या महिन्यांमध्ये केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही. त्या सेवेचे फळ नक्की मिळते. श्रावण महिना हा महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. आणि या महिन्यांमध्ये महादेवांची विशेष पद्धतीने पूजा मंत्रजाप केले जातात. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची सेवा देखील करायला पाहिजे. महादेवांच्या सेवेबरोबरच स्वामी समर्थ महाराजांचे जर पारायण केले तर याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते. आपल्या ज्या काही इच्छा आहेत. त्या लगेच पूर्ण होतात महादेवांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो.

जर आपल्या मनामध्ये कोणतीतरी इच्छा असेल किंवा कोणतीतरी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर श्रावण महिन्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायला पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकता. पण गुरुचरित्राचे पारायणाचे नियम खूप कठीण आहेत. त्यामुळे ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे जमत नाही. त्यांनी सारामृताचे पारायण केले तरी चालते. किंवा नवनाथांचे पारायण देखील आपण करू शकता. गुरुचरित्राचे पारायण, स्वामी चरित्राचे पारायण किंवा नवनाथांचे पारायण या तिन्ही पैकी कोणत्याही एकाचे आपण पारायण करू शकता.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे नियम माहीतच आहेत. गुरुचरित्राचे नियम थोडे कडक असतात त्यामुळे गुरुचरित्र गुरुचरित्राचे पारायण सर्व नियमांचे पालन करूनच करायचे असते. स्वामी चरित्राचे नियम काय नाहीत. ते कशा पद्धतीने वाचायचे आहे. हे सर्वांना माहीतच आहे तरीदेखील दररोज तीन अध्याय याप्रमाणे स्वामी चरित्राचे पारायण करायचे आहे. नवनाथांच्या पारायणाचे देखील काही नियम आहेत. ते नियम समजून घेऊनच नवनाथांचे पारायण करावे अशा पद्धतीने तिन्ही पैकी कोणतेही एक पारायण आपण करू शकता. हे पारायण कोणत्या दिवसापासून करायला चालते.

मित्रांनो आपल्याला जर हे पारायण करायचे असेल तर ते श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारपासून सुरू करू शकता. जर आपल्याला असे वाटत असेल की पारायण याची सुरुवात श्रावण महिन्यापासून सुरू व्हावी आणि त्याची सांगता देखील श्रावण महिन्यामध्येच व्हायला हवी असे जर आपल्याला वाटत असेल तर श्रावण महिन्यातील येणाऱ्या पहिल्या शनिवारपासून आपल्याला हे पारायण करायचे आहे. हे पारायण आपल्याला सात दिवसांमध्ये संपवायचे आहे. त्यामुळे नक्की हे पारायण श्रावण महिन्यामध्ये करायाचे आपल्याला दुप्पट फळ मिळेल.

नियमांचे पालन करून जर पारायण करणे शक्य नसल्यास स्वामी चरित्राचे पारायण करावे. स्वामी चरित्राच्या पारायणाचे कोणतेही नियम नाहीत. हे पारायण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करता येते. स्वामी चरित्राचे पारायण देखील आपल्याला सात दिवसांमध्ये करायचे आहे. रोजचे तीन तीन अध्याय याप्रमाणे जर आपण वाचन केले तर स्वामी चरित्राचे पारायण सात दिवसांमध्ये पूर्ण होते. याचाही लाभ आपल्याला तितकाच मिळेल. कोणतीही सेवा करत असताना ती सेवा मनापासुन, श्रद्धेने आणि विश्वासाने करायला हवी. जी सेवा आपण मनोभावे करतो. ती सेवा आपली कधीही वाया जात नाही त्याचे फळ आपल्याला मिळतेच.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *