जीव गेला तरी चालेल पण श्रावण महिन्यामध्ये ‘ही’ वस्तू कोणाला देऊ नका: लक्ष्मी कायमची निघून जाईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो सध्या पवित्र श्रावण महिना सुरु आहे .या महिन्यामध्ये भोलेनाथाना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत, उपवास केलेले जातात.भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खुप लवकर प्रसन्न होतात आणि त्याना इच्छितवर प्रदान करतात.एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथाना प्रसन्न करून शकतो तर दुसरीकडे जर श्रावण महिण्यामध्ये काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुख,समाधान निघून जात आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते आणि मित्रानो जर श्रावण महिन्यामध्ये कोणालाही कितीही गरज असली आणि एखाद्या व्यक्तीनें तुमच्याकडे पुढीलपैकी कोणतीही वस्तू उधार मागितली तर श्रावण महिन्यात चुकूनही या वस्तू कोणालाही देऊ नका नाहीतर तुमच्या घरात गरीबी दारिद्र्य येऊ शकत.

मित्रांनो काही वस्तू अश्या आहेत कि त्या उधार किव्हा दान आपण श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नये आणि मित्रांनॊ जर श्रावण महिन्यात तुम्ही काही वस्तू दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल बनू शकतात.मित्रानो काही वस्तू श्रावण महिन्यामध्ये उधार किव्हा दान देणं याला मनाई केली आहे. मित्रांनो यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथाशी सबंधीत कोणतीही वस्तू मित्रानो हि वस्तू तुम्ही कोणाला हि उधार देऊ नका जसे कि भोलेनाथाशी संबंधित कोणतेही फळ असेल एखादी वस्तू असेल किव्हा पूजेची सामुग्री असेल ती उधार किव्हा दान म्हणून देऊ नका असे केल्याने तुमच्या घरातून भोलेनाथ निघून जातात त्यामुळे हि गोष्ट नक्की लक्षात ठेवा

मित्रांनो त्याचप्रमाणे श्रावण महिना धन प्राप्तिचा महिना मानला जातो या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्ताच्या घरी येतात अश्यावेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्यकडे पैसे उधार मागत असले तर चुकून हि देऊ नका तसेच उधार पैसे कोणाकडून घेऊ देखील नका असं मानलं जात कि श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाही आणि तुम्ही दुसऱ्याकडून या महिन्यात पैसे उधार घेतले तर ते कर्ज चढत जाते ते कमी होत नाही यामुळे असे करण्यास मनाई केलेली आहे आणि तसेच श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाना दूध दही याने अभिषेक केला जातो पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात.

परंतु लक्षात ठेवा श्रावण महिन्यात कोणी सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध दही ताक किव्हा तांदूळ मागत असेल तर देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी निघून जाते आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेट वस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेले घड्याळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून घड्याळ भेट म्हणून देखील घेऊ नका कारण प्रत्येक व्यक्ती बरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा आपली चांगली वेळ त्या व्यक्तीकडे जाते.

त्यामुळे या श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून भेट म्हणून किंवा उधार म्हणून देखील देऊ नका त्याचप्रमाणे या महिन्यात संध्याकाळनंतर कोणालाही लसून कांदा दूध किंवा दही या वस्तू देऊ नका मित्रांनो श्रावण महिन्यात सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल कोणत्याही वेळी या वस्तू कोणालाही देऊ नका यामुळे आपल्या घराची सुख समृद्धी निघून जाते व तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात आणि या श्रावण महिन्यात दान करण खूप पुण्यदायी मानल जातं परंतु काळ्या रंगाचे वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र उधार किंवा दान म्हणून कोणालाही देऊ नका यामुळे त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात दुःख येत देणाऱ्याच्या कुंडलिकेत राहू दोष निर्माण होतो आणी घेणारी व्यक्ती कंगाल बनते.

आणि जर तुम्हाला दान करायचे असेल तर काळा रंग आणि पांढरा रंग सोडून इतर वस्त्राचे दान तुम्ही करू शकता परंतु ते नवीन वस्त्र असावं. मित्रांनो अनेक लोक जुने कपडे दान करतात असे करू नका जर तुम्हाला दान करायचेच असेल तर काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र सोडून इतर रंगाचे वस्त्र नवीन वस्त्र तुम्ही दान करू शकता पुढची वस्तू म्हणजे अनेक स्त्रियांना सवय असते की स्वयंपाक घरात एखादी वस्तू कमी पडली तर शेजाऱ्यांकडून मागायला जातात तरी या श्रावण महिन्यात असे केल्याने आपल्या घरातील समृद्धी निघून जाते यामध्ये विशेष करून तेल असेल तूप असेल किंवा हळद असेल या तिन्ही वस्तू कोणालाही देऊ नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका यामुळे भगवान भोलेनाथ क्रोधित होतात त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या मिळत नाही . श्रावण महिन्यात आपण कोणाला देऊ नये व कोणाकडून या वस्तू घेऊ नये.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.