संपुर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा ‘ही’ 1 वस्तू, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की श्रावण महिना म्हणजे अत्यंत पवित्र असा महिना या महिन्यात भोलेनाथांची मनोभावे उपासना केली जाते व व्रत केले जातात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा केली जाते यामुळे भगवान भोलानाथ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आणि अश्या पवित्र महिन्यात आपण जे काही उपाय करतो जे काही प्रयोग करतोत त्याचे अनंत पटीने फळ आपल्याला मिळते. त्यामुळेच अश्या श्रावण महिन्यात व्रत उपवास व अनेक ग्रंथाची पारायण केली जातात.

आणि मित्रांनो अश्या पवित्र श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवऱ्यात महिनाभर एक वस्तू ठेवायची आहे. ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि ही वस्तू देवाऱ्यात ठेवल्यानंतर या वस्तूची संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण देवी देवतांची पूजा करतो त्याच प्रमाणे या वस्तूची ही आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. अगदी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूची देवऱ्यात ठेऊन पूजा करायची आहे ही वस्तू नेमकी कोणती आहे ते आपण पाहूया.

मित्रांनो या छोट्याशा उपायाने तुमच्या मनात आहे ते पूर्ण होईल आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. मित्रांनो काही दिवसातच सर्वात पवित्र महिना श्रावण महिना सुरू होणार आहे. महादेवाचा हा महिना आपल्या हिंदू बांधवांसाठी अत्यन्त पवित्र असा हा महिना असतो. श्रावण सोमवारचा व्रत आपण मनोभावाने आणि विश्वासाने करतो आणि आपल्या बऱ्याच मनोकामना देखील पूर्ण होतात.तर मित्रांनो पूर्ण श्रावण महिना तुम्हाला तुमच्या घरात ही एक वस्तू ठेवायची आहे आणि तिची रोज विधिवत पूजा करायची आहे.

मित्रांनो श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूचे पूजन करायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला पूजेच्या दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे. घरात असलेली सुपारी वापरू शकता. आणि ही सुपारी आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी पासून आपल्या घरातील देवाऱ्यात पूजेसाठी ठेवायची आहे. लक्षात ठेवा आपल्या घरातील एखादी जुनी सुपारी असेल जे आपण आधी पूजेसाठी वापरली असेल तर अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही तर नवीन सुपारी आपल्याला या उपायात घ्यायची आहे तर तुम्हाला ती सुपारी आणून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ती सुपारी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे.

आणि त्यानंतर संपूर्ण विधिवत पणे त्या सुपारीचे हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करायची व दिवा अगरबत्ती लावून त्यानंतर सम्पूर्ण श्रावण महिना त्या सुपारीचे पूजन करायचे आहे आणि आपले जे काही मागणे असेल ते मागणे मागायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही सेवा असेल ती करायची आहे. आणि मित्रांनो महादेवाचा मंत्र किंवा जप असेल तो करायचा. पण ती सुपारी महिनाभर देवघरातच राहू द्यायची सकाळ पूजा करताना किंवा साफ सफाई करताना ती उचलावी आणि परत तिला तिच्या जागी ठेवावी. आणि श्रावण महिना सम्पल्यावर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी त्या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *