नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि आपल्यातील अनेक भोले बाबांचे भक्त या महिन्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो या महिन्यांमध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रतवैकल्ये, उपवास केले जातात.
भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात. एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो. तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुखसमाधान निघून जातं आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते.
परंतु मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की या श्रावण महिन्यात आपण कोण कोणत्या गोष्टी करणं टाळायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो या महिन्यांमध्ये चुकून किंवा जाणून-बुजून आपल्याकडून काही चुका होत असतात परंतु मित्रांनो या चुका जर आपण या श्रावण महिन्यामध्ये केल्या तर यामुळे आपल्याला मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं म्हणूनच मित्रांनो ही संकटे आपल्यावर येण्याआधीच आपण सावध होऊन ती करणे टाळले तर यामुळे त्याचा खूप फायदा आपल्याला होऊ शकतो चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या चुका ज्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये टाळायचे आहेत.
मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये वारंवार होत असतील तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला घरामध्ये शांत आणि सुखी वातावरण ठेवायचं आहे मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही घरांमध्ये वादविवाद होतील त्याचबरोबर भांडणे होतील अशी कृती कोणीही करू नये आणि त्याचबरोबर या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला आपले घर हे अगदी पवित्र आणि त्याचबरोबर सुखी आणि समाधानी ठेवायचा आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये ज्या व्यक्ती व्यसन किंवा इतर वाईट कृती करत असतात त्या व्यक्तीने या कृती करणे किंवा व्यसन करणे टाळायचा आहे मित्रांनो ज्या ज्या व्यक्ती व्यसन करत असतात त्या व्यक्तींनी या श्रावण महिन्यामध्ये व्यसनापासून दूर राहणेच पसंत करावे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो शक्यतो या श्रावण महिन्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र घालू नका आणि श्रावण महिन्याचं व्रत तुम्ही करत असाल तर चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग नकारात्मकतेचं प्रतिक असतं. महादेवाची पुजा करताना लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे शुभ मानल्या जातात. तसेच श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे घालणंही शुभ मानल्या जातं.
आणि त्याचबरोबर मित्रांनो असे काही पदार्थ आहेत की जे आपण या महिन्यांमध्ये खाणं टाळलं पाहिजे तर मित्रांनो श्रावण महिन्यात ज्या गोष्टी खाणं आपल्याला टाळायचा आहे त्या पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो श्रावण महिन्याच चुकूनही वांगे, पालेभाज्या, लसूण, कांदे आणि मास-मटण खाऊ नका. या महिन्यात आहारात सात्विक जेवण घ्या.
आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये आपण वाईट विचार मनात आणू नका. मित्रांनो कुठलेही व्रत करताना ते शांत चित्ताने सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून करावे . श्रावण महिन्यात कोणाच्या चुगल्या करू नका तसेच कोणाचा वाईट विचारही करू नका.
मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये जर आपण वर सांगितलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक क लक्षात ठेवल्या आणि त्या करणे टाळले तर यामुळे त्याचा आपल्याला व आपल्या संपूर्ण घराला त्याचबरोबर कुटुंबामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये जर आपण या गोष्टींचे पालन केले त्यामुळे भगवान भोलेनाथ ही आपल्यावर प्रसन्न होतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.