28 जुलै दीप अमावस्या, दिवा प्रज्वलित करताना बोला ‘हा’ एक मंत्र : इच्छा ताबडतोब पूर्ण होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

काही दिवसात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना सुरु होणार आहे. या महिन्याची सुरवात येत्या सोमवारी सुरु होणार आहे. आणि त्या आधी हि दीप अमावस्या आहे. या दिवशी काही विशिष्ट काम पूर्ण करून आपला श्रावण महिना चागला जाऊ शकतो तसेच यामुळे घरातील वाईट गोष्टी नष्ट होतील आणि घरात सुख समृद्धी, आणि आनंदाचे वातवरण तयार होईल.

आणि मित्रांनो यावर्षी 28 जुलै गुरुवार या दिवशी दीप अमावास्या आहे, या दिवशी बरेच जण याला विविध नावाने ओळखले जाते, जसे कि गटारी अमावास्या आणि मित्रांनो दीप अमावास्या संपली कि पवित्र श्रावण महिना सुरु होतो. हि अमावास्या कशी साजरी करावी व या दिवशी घरात कोणते काम करावे या साठी विविध गोष्टी संगितल्या गेल्या आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरात सकारात्मकता, सुख समृद्धी यावी या साठी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा कायची आहे. त्याच बरोबर संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचे आहे यामुळे घरातील सर्व पीडा नष्ट होईल. त्याच बरोबर दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक महिना म्हणजे श्रावण महिना सुरु होणार आहे.

या पूर्ण महिन्यात आपल्या हातून चागल्या गोष्टी घडाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे. मित्रांनो या दीप अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या तंत्र मंत्र शास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केले तर यामुळे याचा चांगला फायदा आपल्याला नक्की होऊ शकतो.

मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण या दीप अमावस्येच्या संध्याकाळचे वेळी केला तर यामुळे आपल्या मनामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी ही लांबेल चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय या दीपा अमावस्येच्या दिवशी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर हा दिवा लावत असताना एक प्रभावी मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे मित्रांनो हा दिवा लावत असताना आपल्याला फक्त एकदा हा प्रभावी मंत्र बोलायचा आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कसा करायचा आहे हा उपाय.

मित्रांनो दीप अमावस्या ह्या दिवशी आपण एक विशेष छोटासा परंतु अतिशय प्रभावी उपाय जो माता लक्ष्मीस प्रसन्न करणारा आहे तो म्हणजे एक तुपाचा दिवा आपण लावायचा आहे. हा दिवा आपण आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. जी वात आपण दिव्यात लावणार आहोत ती आपण लाल रंगाची लावायची आहे.

तर आपण सर्वप्रथम आपल्या घरातील एक ईशान्य कोपरा पाहून तिथे आपण माता लक्ष्मीचा फोटो ठेवून त्यासमोर आपण हा तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मित्रांनो हा दिवा लावत असताना आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे मित्रांनो हा दिवा लावत असताना आपल्याला ज्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
“दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भवः”

मित्रांनो अशा पद्धतीने दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर हा छोटासा उपाय केला आणि हा उपाय करत असताना व सांगितल्याप्रमाणे दिवा लावला आणि दिवा लावत असताना फक्त एकदा वर सांगितलेल्या प्रभावी मंत्राचा जप केला तरी यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा स्थिर वास आपल्या घरात राहील. तर अश्या प्रकारे सोमवती अमावस्याच्या दिवशी वरील पैकी आपण कोणताही एक उपाय शुद्ध व प्रसन्न मानाने करावा ज्यामुळे आपल्याला त्याचे फळ नक्की प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.