श्रावण महिना सुरू होण्याआधी घरातून बाहेर काढा ‘या’ वस्तू : घरात भरभराट येईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो श्रावण महिना सुरू होण्या आधी घरातून बाहेर काढा या गोष्टी घरातून गरिबी वगैरे निघून जाईल आणि तुमच्या घरात कधीही दरीद्री येणार नाही. आपल्याला सवय असते की, आपण कोणताही मोठा सण येतो. तेव्हा घराची साफसफाई करतो. जसा की दिवाळी-दसरा अशावेळी पण मित्रांनो श्रावण महिना हा वर्षातला सर्वात पवित्र महिना मानला जातो. आणि याच महिन्यापासून आपले सर्व हिंदू सण वार सुरू होत असतात. आणि म्हणून श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरातील या चार वस्तू नकारात्मकता, दरिद्री,आणि घरात वाईट शक्ती पसरवतात.

आणि मित्रांनो म्हणून या गोष्टी तुम्ही लगेच घरातून बाहेर काढा. या वस्तू जर आपण घरात ठेवल्या तर घरात नकारात्मकता वाढते. यातील पहिली वस्तू म्हणजे जुने तुटलेले, फुटलेले भांडे मग ते कोणतेही असतील.काचेचे किंवा स्टील कोणतेही असो पण जे तुम्ही सांभाळून ठेवले असाल की पुढे मागे काम येतील तर असे करू नका. तुटलेल्या भांड्यामध्ये राहू केतू चा वास असतो. नकारात्मकता वाढते, म्हणून श्रावण महिना येण्याआधी हे तुटलेले भांडे तुम्ही बाहेर काढून टाका.

दुसरी वस्तू म्हणजेच खंडित मूर्ती किंवा तुटलेले, फाटलेले फोटो जे आपल्या देवघरात असतात किंवा काही लोकांच्या देवघरात असतात. पण लोक तरी ते देवघरात ठेवून त्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करतात. पण हे अगदी चुकीच आहे. आपण त्या मूर्तीच किंवा फोटोच विधिवत पूजन करून त्यांचे विसर्जन करावे व त्याच्या जागेवर नवीन फोटो आणून तो आपल्या देवघरात स्थापन करावा.

तुम्ही खंडित मूर्ती कोणत्या मंदिरात जाऊन ठेऊ सुद्धा शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे जुने कपडे जे आपण घरात ठेऊन असतो की, कोणीतरी मागायला येतील. तेव्हा देऊ किंवा या कपड्यांच्या मोबदल्यात काही वस्तू मिळतील अस काहीतरी असत. कपड्यांमध्ये सुद्धा नकारात्मकता आणि दरिद्री असते. तर ही दरिद्री तुम्हाला बाहेर काढायची आहे तर त्या कपड्यांना सुद्धा तुम्हाला बाहेर काढावे लागेल.

चौथी गोष्ट म्हणजे बंद पडलेला इलेट्रॉनिक चा सामन त्यात बंद पडलेल घड्याळ असेल, रेडिओ असेल किंवा एखादी मोबाईल अशा कोणत्याही वस्तू असतील ज्या बंद पडलेल्या आहे. पण आपण तर घरात ठेवलेले असतात. खास करून घड्याळ बंद पडलेले घरात ठेवायलाच नाही पाहिजे. त्यासोबतच अन्य इलेट्रॉनिक वस्तूही बंद पडलेल्या घरात ठेवू नका. तर तुम्ही सुद्धा या ४ वस्तू घरात ठेवू नका, त्या लगेच बाहेर काढा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.