रात्री भीती वाटते?भयानक स्वप्न पडतात?उद्या काय होईल याची चिंता असते? तर रोज ‘हे’ एक काम करा सगळे वाईट दूर होईल, पाहिजे तेच घडेल!

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला रात्री भीती वाटते?
भयानक स्वप्न पडतात?उद्या काय होईल
याची चिंता असते? तर रोज ‘हे’ एक काम करा, सगळे वाईट दूर होईल, पाहिजे तेच घडेल! हो मित्रांनो या वरिल एक छोटासा उपाय आज आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो काही जणांना रात्री झोप लागत नाही वाईट स्वप्ने पडतात. त्या स्वप्नांमध्ये वाईट अशा गोष्टी प्रत्येकाला दिसतात. त्यामुळे त्यांची झोप नाहीशी होते. काहीजणांना आपल्या नोकरीची व्यवसायाची किंवा असे काहीतरी घडेल अशी चिंता लागलेली असते. आणि यामुळे ते अशांत अस्थिर असतात.

तर मित्रांनो या परिस्थितीवर एक छोटासा उपाय आज आपण पाहणार आहोत तो खालील प्रमाणे. यासाठी आपणाला रोज संध्याकाळी सात वाजून गेल्यानंतर रात्रि सूक्त हा स्तोत्र वाचायचा आहे किंवा म्हणायचं आहे. हा स्तोत्र मित्रांनो आपणाला तीन वेळेला म्हणायचं आहे.

हा स्तोत्र म्हटल्याने आपल्या वर सांगितल्याप्रमाणे सर्व अडचणी दूर होतील आणि आपणाला जे हवे तेच घडेल. आपणावर स्वामी कृपा होईल.

हे रात्रि सूक्त तुम्हाला इंटरनेटवर कुठेही उपलब्ध होईल त्याचबरोबर ते आम्ही खाली सुद्धा देत आहोत ते आपण प्रिंट काढून किंवा आपल्या मोबाईल मध्ये ठेवून रोज सायंकाळी वाचले तरी चालेल..

रात्री सूक्त स्तोत्र खालील प्रमाणे….

|| रात्री सुक्त || (मराठी)

नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला | करालवदनेला, कालीला नमितो दुष्टग्रहविनाशिनीला | नमितो रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||१|| हाती खङग खेट धारिणीला नमितो त्या भयानक देवीला | संरक्षणास भक्तलोका हाती धरी ती वरदाभयमुद्रा | नमितो रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||२|| हाती शंख, चक्र, गदा चाप धारिणीला |चतुर्भुज अष्टभुज आणि द्विभुज देवीला | शत्रुमर्दिनीला देवीला रात्रीदेवीला | नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||३|| अठराहस्त लक्ष्मीला दशहस्त सरस्वतीला | सर्व संपदा दात्रीला सर्व विद्या दात्रीला | नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||४|| हजार हात हजार चरण हजार मुखलोचनेला | हजार मुकुटेधारिणीला हजार चरणाम्बुजेला | कमलयोनिमुखारुढेला विष्णुवक्षःस्थित देवीला | शिवांकावरील गौरीला त्रयात्मिकेला देवीला | नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||६|| उग्र वैष्णवी देवीला कुलाला शोभित करणाऱ्या देवीला | रक्ताक्षी निर्दहतीला देवीला सिंहवाहन देवीला | नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||७|| मधुकैटभ संहारिणीला देवीला महिषासुर मर्दिनीला देवीला | शुभ निशुंभ वधयित्रीला देवीला | नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||८|| इंद्रादिदेवतांच्या सर्व शक्तिस्वरुपेला देवीला | सूर्यादिग्रहमण्डलाच्या सर्व शक्तिस्वरुपेला देवीला | नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ||९||
रात्री तीनवेळा प्रत्येक दिवशी | या रात्रीसुक्ताचा पाठ करावा | भूत प्रेत पिशाच चोर सर्पयांचा विनाश होई | निःसंशय होई रात्रीदेवी क्रुपेने ||१०||
|| इति श्री मराठी अनुवादित रात्रीसुक्तम समाप्त ||
श्री गुरुदेव दत्त…!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *