नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या दुःखाचे व अडचणीचीतून बाहेर पाडण्यासाठी आपण हनुमानांकडे पाहतो. हनुमान संधर्भात जे काही उपाय केले जातात ते खूप फळ देणारे असतात, व जास्तीत जास्त फळ देणारे असतात. कारण हनुमान हे चिरंजीव आहेत. त्यांना स्वतः राम भगवंतानी जगाचे कल्याण करण्यासाठी चिरंजीव राहण्याचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि मित्रांनो हनुमानाच्या पूजेचे जसे तात्काळ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तसेच हनुमान चालीसा पठाणाने देखील लवकर चांगले परिणाम बघायला मिळतात. म्हणूनच बहुतेक व्यक्ती मनोकामना पूर्तीसाठी मनातील भीती घालवण्यासाठी, नाकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी हनुमान चालिसचे पठण करतात.
आणि मित्रांनो हनुमान चालीसा वाचल्यामुळे आपल्या मनातील भीती नष्ट होऊन आपण धाडसी बनतो, आपल्या अनेक इच्छा हनुमान स्वतः पूर्ण करतात. म्हणून हनुमान चालीसाचे पठण अवश्य करावे. परंतु असे अनेकजण म्हणतात कि स्त्रियांनी हनुमान चालीसाचे पठण करू नये, कारण हनुमान हे ब्रह्मचारी आहेत.
त्यांना स्त्रियांची सावली देखील चालत नाही, परंतु हे पूर्णतः सत्य नाही. आणि मित्रांनो आपल्यावरील संकटे, दुःख, बाधा दूर करण्यासाठी कोणीही हनुमान चालीसाचे पठण करू शकते. हनुमानांनी स्वतः अशोक वाटीकामध्ये जाऊन सीता मातेच्या दुःख व कष्टाचे हरण केले होते. त्या साक्षात प्रभू श्री रामांच्या अर्धांगिनी असताना, त्यांचे दुःख दूर केले तर आपण तर साधारण स्त्री आहोत आपले दुःख तर सीता मातेच्या दुःखासमोर काहीच नाही.
आणि म्हणून आपले दुःख देखील हनुमान नक्कीच निवारतील म्हणून हनुमान चालीसाच्या पठण करून आपण हनुमंताची नक्कीच सेवा करू शकतो त्याशिवाय, हनुमान चालीसा मध्ये देखील बोलले आहे कि जो पढे हनुमान चालीसा म्हणजेच जो कोणी हनुमान चालीसा वाचेल मग त्यात स्त्री पुरुष लहान मोठे असा काहीही उल्लेख नाही, म्हणजेच सर्वजण हनुमान चालीसा वाचू शकतात त्यात भेदभाव चा काहीच विषय येत नाही.
आणि मित्रांनो असे ही म्हणतात कि स्त्रिया जन्मतःच धाडसी असतात, आणि हनुमान ब्रह्मचारी असल्याने जर स्त्रियांनी हनुमान चालीसा पठण केल्याने त्यांच्यात काही विशिष्ट गुण उतरण्याचे शक्यता असते, म्हणून शक्यतो हनुमान चालीसाचे पठण स्त्रियांनी करू नये मात्र आजकाल स्त्रियांनी देखील मागे राहून चालणार नाही त्यांना देखील पुरुषांच्या बरोबरीने यायचेच आहे. मग एका अर्थाने चांगलेच आहे कि स्त्रिया जास्त मजबुत व धाडसी बनतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.