‘हा’ चहा घरातील लहान-मोठे वृध्द कोणालाच आजारी पडू देणार नाही, सर्दी ,खोकला, छातीतील कफ चुटकीत करेल गायब!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण चहा पीत असतात. चहा हा प्रत्येकाचा जीव की प्राण असतो. दिवसभरातून आपल्यापैकी अनेकांना चहा हा लागतोच कितीही वेळ किंवा कितीही उशीर झाला असेल तरी चहा सर्वांना हवाच असतो. चहा प्यायल्याने आपल्याला तरतरी मिळते आणि आपला दिवसभराचा थकवा पूर्णपणे निघून जातो परंतु ही चहा पीत असताना आज आपण या चहा मध्ये असे काही दोन पदार्थ वापरणार आहोत, ज्यामुळे चहाचा स्वाद लागणारच आहे पण त्यामुळे या पदार्थांच्या सहाय्य मुळे आपल्या शरीरातील असंख्य आजार सुद्धा दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

तसे तर हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात परंतु आजचा उपाय आपण चहा मध्ये टाकून करणार आहोत.जे पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते उपाय करण्यासाठी आपण साध्या पाण्यांमध्ये हे पदार्थ टाकू शकतो परंतु आपल्या येथे जास्तीत जास्त लोक चहा पीत असल्यामुळे आपण हे पदार्थ चहा मध्ये टाकणार आहोत.हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. अनेकदा वातावरणामध्ये बदल झाला तर आपल्याला सर्दी ,खोकला, श्वास घेण्यात अडथळा यासारख्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात म्हणूनच हा उपाय करताना आपल्याला चहा बनवायची आहे.

परंतु मित्रांनो चहा बनवताना दुधाची चहा बनवण्या ऐवजी आपल्याला काळी चहा बनवायची आहे आणि मित्रांनो हा चहा बनवण्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे परंतु ती हळद आपल्याला आधी भाजून घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भाजलेली हळद वापरायची आहे. कच्ची हळद वापरायची नाही हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते.ही हळद भाजताना आपल्याला काळी पडू द्यायची नाहीये, हलकी हळद आपल्याला भाजायची आहेत त्यानंतर आपल्याला चहा बनवण्यासाठी काळीमिरी लागणार आहे.काळी मिरी पावडर आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायचे आहे काळी मिरी मध्ये पेपरीन नावाचा घटक असतो ते आपल्या शरीराला मजबुती देण्याचे कार्य करते.

आणि त्यानंतर आपल्या तिसरा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे आले. मित्रांनो जर तुमच्याकडे आले नसेल तर तुम्ही सुंठ सुद्धा वापरू शकता. वातावरणातील बदलामुळे किंवा संक्रमणाच्या आजारांमुळे व अनेकदा आपल्याला सर्दी, खोकला,कफ तयार होत असतो आणि यामुळे आले अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आले थोडेसे बारीक किसून घ्यायचे आहे.जास्त आले टाकली तर त्याची चव तिखट होऊ शकते अशा प्रकारे हे सगळे मिश्रण टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने चहा प्यायचा आहे आणि किसणीच्या साह्याने काढून घ्यायचा आहे.

आता ही चहा आपल्याला दिवसभरातून दोन वेळा जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. हा उपाय केल्याने सर्दी खोकला पूर्णपणे बरा होतो त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुमच्या शरीरामध्ये थकवा निर्माण झालेला आहे तो सुद्धा गायब होतो म्हणूनच आपले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *