फक्त पाच सोमवार करा ‘हे’ व्रत : तुमची कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो जर तुमच्या मनात अनेक वर्षे एखाद्या इच्छापूर्तीची आतुरता असेल पण काही केल्याने ती पूर्ण होत नसेल तर हे 5 सोमवार पशुपती व्रत अवश्य करा. मित्रांनो शिव- पुराणामध्ये आणि त्याचबरोबर स्कंदपुराणात पशुपती या व्रतातचे अनेक नियम सांगितले आहेत. हे व्रत करणाऱ्या साधकाने काय करावे, कुठले दान करावे ही सविस्तर माहिती आज तुम्हांला सांगणार आहोत.

आजच्या काळात नियम पाळणे शक्य नाही . सोप्या भाषेत शास्त्ररास मान्य होईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत हे व्रत आज आपण पाहणार आहोत आणि वासरू मित्रांनो हे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यात सुरवात करून सलग 5 सोमवार हे व्रत करावे.

आणि मित्रांनो इच्छा प्राप्ति साठी हे व्रत करताना अडचण आली ,मासिक धर्म आला असेल तर पुढील सोमवार पकडून हे व्रत करावे. प्रत्येक सोमवारी ब्रम्ह मुहूर्तावर उठावे.स्नान वैगरे करावे. सूर्याला अर्ध्य द्यावे. सूर्याला अर्ध्य म्हणजे तांब्याचा तांब्यात पाणी घेउन दोन्ही हात वर करून सूर्याला पाणी अर्पण करणे.

अर्ध्य देताना ओम सुर्याय नमः हा जप करावा आणि तुमच्या घराशेजारी असणाऱ्या शिव मंदिरात जावे. भगवान श्री शंकराची , भोळेबाबाची , शिवलिंगाची प्रार्थना करावी. जल अर्पण करावे. त्यासाठी पाणी आपल्याच घरातील घेऊन जावे आणि मित्रांनो मंदिरातील पाणी अजिबात घ्यायचे नाही आणि श्री शंकराला आवडणाऱ्या वस्तू सोबत घेऊन जावे.

श्री शंकर ,भोळेबाबांना बेलपत्रक खुप आवडती आहेत. भोळेबाबाची पूजा करा. 108 बेलपत्रक शिवलींगवर पालथी ठेवावीत. 108 वेळा ” ओम नमो शिवाय” हा जप किंवा मंत्र म्हणावा. महिलांनी “नमो शिवाय” हा जप करावा आणि शिवलिंगावर पूजा,अभिषेक जेवढं करता येईल तेवढं करावे आणि मित्रांनो पूजा करताना आपली इच्छा शिवलिंग समोर बोलून दाखवावी आणि त्या दिवशी म्हणजेच सोमवारी उपवास करावा. फक्त फळआहार घ्यावा.आणि संध्याकाळी प्रदोषकाळी पुन्हा पूजा करा.

आणि मित्रांनो पुन्हा शिवमंदिरात जावे आणि जाताना घरूनच 6 तुपाचे दिवे सोबत न्यावे. साखर किंवा मिठाई न्यावी.शिवलिंगाची पूजा करावी. सकाळी प्रार्थना केली असेल तरीही संध्याकाळी पुन्हा प्रार्थना करा. तुम्हाला यश,सुख समृद्धी, वैभव ,आरोग्यासाठी प्रार्थना करा आणि 6 दिव्यापैकी 5 दिवे प्रज्वलीत करा. प्रार्थना करा.

जे काही सोबत गोड नेले असेल तर त्याचे 3 भाग करा. 2 भाग शिवशंकराला अर्पन करा. 1 दिवा आणि मिठाईचा एक भाग घरी घेउन या. घरात प्रवेश करण्यापूर्वी चौकटीच्या उजव्या हाताला उंबऱ्याजवळ तो एक दिवा प्रज्वलीत करावा. मिठाईचा घरी आणलेला एक भाग कुटूंबासोबत प्रसाद म्हणून खावा.

5 सोमवार हे व्रत मनोभावे, भक्तिभावाने ,पूर्ण श्रद्धेने हे व्रत कुणीही करू शकता. तुमच्या घरात दारिद्र्य, गरिबी,कोणताही आजार, जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी हे व्रत करा. तुम्ही भोळेबाबाचें भक्त नसाल कधी पूजा करत नसाल तरीही हे व्रत करू शकता.आणि मित्रांनो इष्ठ दैवत,ग्रामदैवत ते सुद्धा शिवशंकराला मानतात. सृष्टीचा सांभाळ करणारे भगवान श्री हरीविष्णू ,श्रीराम, श्रीकृष्ण, श्री तिरुपती बालाजी रुपात भोळेबाबांची पूजा करताना दिसून येतात.मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या इच्छापूर्ती सांगितल्या प्रमाणे 5 सोमवार हे व्रत जरूर करून पहा आणि मग फरक बघा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.