नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो ज्योतिषशास्त्रात असे सांगितले गेले आहे कि कि हातात दोरा बांधणे खूप शुभ असते. आपण अनेकांच्या हातात लाल, पिवळा, किंवा काळा दोरा बांधलेला पाहतो. हातात दोरा बांधणाऱ्या व्यक्तींमधून काही व्यक्ती तर आवड म्हणून विविध रंगांचे दोरे हातात बांधतात. तर काही व्यक्ती धार्मिक मान्यतेनुसार व ज्योतिषशास्त्रानुसार हातात लकी रंगाचा दोरा बांधतात आणि मित्रांनो अनेकजण फॅशन म्हणून अनेक रंगाचे धागे आपल्या हातात बांधतात, तर काही जण धार्मिक प्रवृत्तीने काही धागा हातात बांधतात.
तर मित्रांनो आज आपण हातात बांधणाऱ्या दोऱ्यांबद्दल काही विशेष बाबी जाणून घेणार आहोत. आता आपण पाहणार आहोत कि कोणत्या विशेष राशींनी हातात लाल रंगाचा दोरा बांधावा.
सिंह राशीच्या व्यक्तींनी हातात लाल रंगाचा दोरा बांधला तर त्यांच्यासाठी हे खूपच शुभ आहे. लाल दोरा हातात बांधल्यामुळे यांना भगवंतांकडून शक्तीही प्राप्त होईल. तसेच त्यांना नोकरी व व्यवसायातही यश मिळत राहील. या राशीचे व्यक्ती स्वच्छ मनाने व श्रद्धा विश्वासपूर्वक जर लाल दोरा हातात बांधतील तर हे कोणावर जर खरे प्रेम करत असतील तर ते प्रेमही यांना नक्कीच मिळेल. तसेच जीवनात साकारात्मकता राहील म्हणूनच मित्रांनो सिंह राशीच्या व्यक्तींनी हातात लाल रंगाचा धागा नक्की बांधला पाहिजे यामुळे या राशीच्या लोकांना अनेक कामांमध्ये यश देखील मिळते आणि त्याचबरोबर या राशीच्या लोकांनी हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधल्यामुळे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदारही नक्की मिळेल.
कर्क राशीच्या व्यक्तींनी हातात लाल दोरा बांधणे खूप शुभ असते. कर्क राशीच्या व्यक्तींनी जर हातात लाल दोरा बांधला तर यांच्या व्यवसायात भरभराट होते. देवी लक्ष्मीचीही यांच्यावर कृपा होते. प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे हे व्यक्ती आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर अगदी सहजतेने उपाय शोधून काढतात व आपल्या जीवनात येणाऱ्या मोठ्यात मोठ्या अडचणींवर सामना करतात आणि कर्क राशीच्या व्यक्तींनी मंगळवारी हातात लाल दोरा बांधवा व हनुमानांचे दर्शन घ्यावे. असे केल्याने यांच्या जीवनातील सर्व कष्टांचे निवारण होईल आणि जीवन सुख व आनंदाने भरून जाईल.
मिथुन राशींच्या व्यक्तींनीही आपल्या हातात लाल रंगाचा दोरा जरूर बांधावा. लाल दोरा बांधल्याने यांच्यावर कोणत्याही शत्रूचा प्रभाव पडत नाही. लाल दोरा जर हातात बांधलेला असेल तर मिथुन राशींच्या व्यक्तींना खूप मान सन्मान मिळतो. त्याचबरोबर हनुमानांची कृपाही यांच्यावर सदैव राहते. हनुमानांची कृपा असल्यामुळे यांच्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण होते. त्याचबरोबर यांच्या विवाहात जर काही अडचणी येत असतील तर त्याही दूर होतील.यांच्या जीवनात काही दोष असेल तर तोही दूर होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींनी शुक्रवारी आपल्या हातात लाल दोरा बांधवा. ज्यामुळे यांच्या जीवनातील यशाचे सर्व मार्ग मोकळे होतील. व हे जीवनात खूप पुढे जातील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.