13 जुलै गुरुपौर्णिमा स्वामींना दाखवा ‘हा’ नैवेद्य, स्वामी प्रसन्न होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की उद्या 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आली आहे आणि आपल्यातील अनेक स्वामी भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि मित्रांनो गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामींचा आवडता दिवस , स्वामी भक्तांसाठी , स्वामींच्या सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस , स्वामींची सेवा करण्याचा दिवस , विशेष नैवेद्य दाखवण्याचा दिवस आहे आणि हा दिवस चुकवू नका , ह्या दिवशी स्वामींची विशेष पूजा केली जाते , विशिष्ट मंत्र जाप करून त्यांना प्रसन्न केले जाते कारण मित्रांनो गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना म्हणजेच आपले स्वामींना विशेष महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी आपल्यातील प्रत्येकाने स्वामींची सेवा केलीच पाहिजे.

चला तर जाणून घेऊयात कि स्वामींना कोणता नैवेद्य कोणत्या वेळी दाखवावा , असे केल्याने स्वामी प्रसन्न होतील , तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि घराची भरभराट होईल.गुरुपौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा असतो, पहाटे पासूनच ह्या दिवसाची सुरुवात करायची असते , सर्वात अगोदर अंघोळ वैगरे सर्व आटपून स्वामींसमोर बसून त्यांची पूजा करा , धूप दीप अगरबत्ती दाखवून आरती करा. स्वामींनी त्या वेळी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवा. एक वाटी दूध घेऊन थोडीशी साखर त्यात टाकावी आणि वरून एक तुळशीचे पान त्यावर ठेवावे.

नैवेद्य दाखवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कि नैवेद्यामध्ये पाणी सुद्धा असावे. दूध , साखर आणि एक ग्लासमध्ये पाणी असा नैवेद्य सकाळी तुम्हाला दाखवायचा आहे. त्यांनतर सकाळी १० वाजल्याचा आत स्वामींना जेवणाचा नैवेद्य दाखवावा . नेहमी जेवण जे काही तुम्ही कराल त्याचा नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे. पण एक गोडाचा पदार्थ जरूर बनवा कारण मित्रांनो स्वामींना गोड पदार्थ खूप आवडतात म्हणून मित्रांनो शक्यतो या दिवशी आपल्याला स्वामींना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे.

संध्याकाळी जेव्हा पूजा करता तेव्हा सुद्धा तुम्हाला रात्री जे काही बनवले असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण नैवेद्यामध्ये गोडाचा पदार्थ असावा. हे नैवेद्य दाखवताना पूर्ण श्रद्धा ,प्रेम भावना आणि आपुलकी असावी. असे तिन्ही वेळा तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचे आहे. सकाळी दूध साखर , दुपारी आणि रात्री जे काही जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य सोबत एक गोड पदार्थ.हे नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांना वर सांगितलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ यांच्या नामाचा 21 वेळा किंवा जर शक्य असेल तर 108 वेळा जप सुद्धा या दिवशी करायचा आहे कारण मित्रांनो गुरु पूर्णिमाच्या दिवशी अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण जर स्वामींची मनोभावे पूजा केल्याने ते नक्कीच प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची विशेष पूजा केली जाते. पण हे सगळे करत असताना मनामध्ये कोणताही मतभेद नसावा , कोणताही स्वार्थ नसावा. मनोभावे ,पूर्ण विश्वासाने हि पूजा केली तरच त्याचे फळ मिळते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *