नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
या वर्षी 13 जुलै रोजी बुधवारच्या दिवशी गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना आई वडीला एवढेच किंवा त्यांच्या पेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांचे पूजन केले जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपूजनाचा दिवस.
गुरू हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे कुंडलीत गुरु प्रधान असेल तेव्हा कामात यश, कीर्ती आणि शांती प्राप्त होते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंचा आशीर्वाद मिळवून स्वतःची प्रगती करण्याचा आणि गुरू ग्रहाला बळ मिळवण्याचा एक शुभ मुहूर्त आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये ही गुरुपौर्णिमेला खूप महत्व प्राप्त आहे. काही लोकांच्या कुंडलीमध्ये जर दोष असेल किंवा नसला तरीही काही कारणामुळे आपल्या जीवनात समस्या येत असतील तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करून आपण त्या समस्यांपासून सुटका मिळवू शकतो. मित्रांनो आपल्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार दान आणि काही चमत्कारी मंत्रांचा उच्चार केल्याने आपल्यावरील समस्या टळतात.
आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते दान करावे आणि कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या चमत्कारी मंत्राचा उच्चार करावा म्हणजे त्याचे फळ त्यांना योग्यरीत्या प्राप्त होईल.
मित्रांनो सर्वात पहिली रास आहे मेष, मित्रांनो मेष राशीच्या लोकांनी या दिवशी “ओम अव्येयाय नमः” या मंत्राचा जप करावा. तसेच गरीब व गरजू व्यक्तींना लाल रंगाचे वस्त्र दान करावे. आणि त्याचबरोबर मित्रांनो दूसरी रश आहे वृषभ राशी. मित्रांनो वृषभ राशीच्या व्यक्तींनी गुरु कृपा प्राप्त आणि तुमच्या करिअरमध्ये यश प्राप्त करण्यासाठी या दिवशी “ओम जीवाय नमः” या मंत्राचा जप करावा. आणि पांढऱ्या रंगाच्या वस्त्राचे दान करावे.
मित्रांनो त्या पुढची आणि तिसरी रास आहे ती म्हणजे मिथुन राशी, मित्रांनो मिथुन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी “ओम भिवराय नमः” या मंत्राचा जप करावा. आणि आपल्या गुरूंना किंवा गुरू स्वरूप समजून एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला हिरवे वस्त्र दान करावे. आणि मित्रांनो त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कर्क राशी, मित्रांनो कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी “ओम वरिष्ठ आय नमः” या मंत्राचा जप करावा आणि सुख आणि समृद्धी आणि आनंदासाठी बादामी कलर म्हणजे क्रिम रंगाची कापड दान करावे.
आणि मित्रांनो त्यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी, मित्रांनो सिंह राशीच्या लोकांनी सुख समृद्धी व आनंदासाठी गुलाबी रंगाची वस्त्रे दान करावी व “ओम स्वर्णकायाय नमः” या मंत्राचा जप करावा आणि पुढची रास आहे कन्या राशी, मित्रांनो कन्या राशीच्या व्यक्तींनी या दिवशी “ओम हरेंय नमः” या मंत्राचा जाप करून, हिरव्या रंगाचे कापड किंवा वस्त्रे गरजूंना वाटावी आणि त्या पुढची राशी आहे ती म्हणजे तूळ, मित्रांनो तूळ राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी “ओम विवित्तताय नमः” या मंत्राचा जप करून, खादीचे कपडे कुणालातरी भेट म्हणून द्यावे. यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल.
आणि त्यानंतरची राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी, मित्रांनो वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी “ओम जीव नमः” या मंत्राचा जाप करून एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला धोतर दान करू शकतात तुम्ही ते धोतर रेडिमेट सुद्धा आणू शकता. या पुढची राशी आहे धनू राशी, मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी धनू राशीच्या व्यक्तींनी या दिवशी “ओम जेत्रे नमः” या मंत्राचा जप करावा. आणि एखाद्या व्यक्तीला थोडेसे सोने भेट म्हणून द्यावे यामुळे तुमच्या जीवनात अगदी त्या सोन्यासारखे उजळून निघेल.
आणि त्यानंतरची राशी आहे मकर राशी, मित्रांनो मकर राशीच्या लोकांनी या दिवशी “ओम गुणेंय नमः” या मंत्राचा जप करावा. आणि पंच धातू तसेच वस्त्रांचे दान करावे. या तुम्ही पंचधातूंची अंगठी ही दान करू शकतात सोबतच तुम्हाला वस्त्रे जी शक्य होतील ती देऊ शकतात त्यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी, मित्रांनो कुंभ राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी “ओम धीवराय नमः” या मंत्राचा जप करावा आणि लोकरीच्या वस्तूचे दान करावे स्वेटर मफलर किंवा टोपी यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तींना देऊ शकतात.
आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे मिन राशी, मित्रांनो मीन राशीच्या व्यक्तींनी ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी “ओम धीवराय नमः” या मंत्राचा जप करावा आणि निळ्या रंगाची वस्त्रे गरजूंना किंवा गरिबाला दान करावी. तर मित्रांनो आता तुम्हाला लक्षात आलेच असेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि कोणते वस्त्र दान करावे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.