सोमवारी भगवान महादेवाची ‘अशी’ पूजा केल्याने भक्तांना मिळतात ‘हे’ अनेक धनलाभ!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो देवाधिदेव महादेव हे त्रिदेवांपैकी एक आहेत. महादेवांना भोलेनाथ सदाशिव अशा विविध नावांनी ओळखले जाते कारण महादेव भोलेनाथ आहेत. म्हणून भक्ताच्या थोड्याशा पूजनानेही खूप लवकर प्रसन्न होतात व इच्छित फळ प्रदान करतात. परंतु कधीकधी आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही कारण आपल्याला महादेवाच्या पूजनाची योग्य पद्धतच माहीत नसते. आपण चुकीच्या पद्धतीने महादेवांचे पूजन केले तर त्याचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही. मग काही भक्त म्हणतात की मी महादेवांचे इतके पूजन केले आराधना करतो पण पूजेचा कोणताही लाभ मिळत नाही.

मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की देवाचे देव महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागते. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की देवाधिदेव महादेव हे भक्तांच्या फक्त एक तांब्या पाणी अर्पण केल्यानेही प्रसन्न होतात. म्हणून आपण घरातून पाण्याचा रिकामाच तांब्या तर नेतो कारण आपल्याला रस्त्याने जाताना तांब्या हाताला जड लागेल किंवा पाणी खाली सांडेल. या दोन कारणांमुळे आपण मंदिरात सरळ रिकामा तांब्या घेऊन जातो व तेथेच पाण्याची टाकी नळ जे काही असेल तेथील पाणी घेऊन महादेवांना अर्पण करतो.

परंतु मित्रांनो शास्त्र असे सांगते की महादेवांना जे पाणी अर्पण करायचे आहे ते आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यातील पाणी असावे. कारण देवाचे देव महादेव जसे देवांचे देव आहेत तसेच ते म्हणूनच तेच स्मशानातील आणि राक्षसांचा देखील देव आहेत. घरातील पिण्याच्या पाण्यात पितृदोष एकवटलेला असतो ज्यामुळे ज्यावेळी आपण त्या पाण्यातून एक तांब्या भरून महादेवांच्या मंदिरात घेऊन जातो व त्यांना ते पाणी अर्पण करतो त्यावेळी आपला तो पितृदोष नष्ट होत असतो. म्हणून महादेवांच्या मंदिरात जाताना घरूनच पाणी सोबत न्यावे. त्याशिवाय आपण ज्यावेळी भरलेला पाण्याचा कलश सोबत घेऊन जात असतो त्यावेळी त्या व्यक्तींची नजर त्या भरलेल्या कलशावर असते.

व्यक्ती ज्या कामानिमित्त घराबाहेर पडलेले असतात त्यांचे कार्य नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होते. म्हणून घरून मंदिरात जाताना पाण्याने भरलेला कलश सोबत न्यावा.मित्रांनो त्याशिवाय भगवंतांच्या मंदिरात प्रवेश करताना नेहमी हसतमुखाने व आनंदाने प्रवेश करावा. कारण भगवंतांच्या मंदिरात जाताना आपण जसे जातो तसेच भगवंतही आपल्या घरी त्याच पद्धतीने येतात. बहुतेक व्यक्तींना आपले दुःख त्रास भगवंतांना सांगायचे असतेह त्यासाठीच ते मंदिरात जातात आणि तोंड पाडून दुःखी कष्टी चेहरा करून बसतात. परंतु यामुळे भगवंत आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत.

मित्रांनो आपण महादेवांना अर्पण करण्यासाठी जी कोणती वस्तू नेतो जसे पाणी दूध फळे फुले ते संपूर्ण भगवंतांना अर्पण करावेत. त्यातील थोडेसेही शिल्लक ठेवून घरी आणू नये. कारण महादेवांना अपूर्ण असे काहीही आवडत नाही. त्यांना सर्व काही संपूर्ण हवे असते. परंतु मंदिरातून घरी येताना आपल्या सोबत महादेवांना आपण जे जल अर्पण करतो ते थोडेसे जल आपण सोबत घरी जरूर आणावे. कारण महादेवांना अर्पण केलेले पाणी हे गंगाजल होऊन जाते आणि आपण गंगाजल घरी आणल्याप्रमाणे होते.

मित्रांनो घरी आणल्यानंतर ते पाणी घरातील सर्व सदस्यांनी डोळ्याला लावावे व संपूर्ण घरात ते पाणी शिंपडावे. यामुळे देवाचे देव महादेवांच्या कृपेमुळे आपले घर धनसमृद्धीने भरून जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात प्रसन्न उत्साही व पवित्र वातावरणाची निर्मिती होते आणि मित्रांनो भगवंतांच्या मंदिरात जातानाही रिकामा तांब्यासोबत घेऊन जाऊ नये तसेच तेथीलच पाणी घेऊन भगवंतांना ते अर्पण करतो रिकामाच तांब्या घेऊन घरी परततो.

परंतु यामुळे आपला पितृदोष आणि नष्ट होत नाही व घरात सुख समृद्धीही येत नाही. आपण केलेले पूजन निष्फळ ठरते. त्याचा आपल्याला कोणताही फायदा होत नाही. म्हणून देवाचे देव महादेवांचे पूजन करताना जर तुम्हीही या छोट्या छोट्या दिसणाऱ्या परंतु मोठ्या प्रभाव पडणाऱ्या चुका करीत असतील तर आजच त्या चुका दुरुस्त करा आणि देवाधिदेव महादेवांचे नियमाप्रमाणे व्यवस्थित पूजन करून महादेवांना प्रसन्न करून घेऊन आपले घर धनसंपत्ती आणि सुख-समृद्धीने भरून टाका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *