10 जुलै आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी व्रत कथा व संपूर्ण माहिती!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आषाढी एकादशी म्हटलं तर लगेच टाळ, मृदुंगाच्या आवाजात लाखो वारकीर पंढरपूरकडे जातानाचे दृष्य डोळ्यासमोर येते. विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात. या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याला खूप महत्त्व असते.

जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात. आषाढीच्या एकादशीचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या वारीला जाण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि ते वारी करून घरी परत जाईपर्यंत शेतातील माल वाढू लागलेला असतो.

धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. या काळात देवांची रात्र असते त्यामुळे सर्व देव झोपी जातात.

यामुळेच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. अशी मान्यता आहे की या काळात असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्‍तींपासून सुरक्षित राहण्यासाठी व्रत करणे आवश्यक असते. त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे.

एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचे असते. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा असतो.

यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात आणि मित्रांनो या एकादशीला वारी पायी केली तर शारीरिक तप घडते असाही समज आहे. तसंच सर्व पाप यामुळे निघून जाते असाही समाज आहे. म्हणूनच अत्यंत मनोभावे हे आषाढी एकादशीचे व्रत करण्यात येते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या एकादशी दिवशी आपण भगवान विष्णूंना केशर घातलेल्या दुधाने अभिषेख करावा असे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. एकादशी च्या दिवशी पहाटे स्नान झाले कि गायत्री मंत्राचा जप करावा ह्यामुळे देवी लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंची आपल्यावरती कृपा होते. मित्रांनो आपण भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन आपण त्यांना पांढऱ्या मिठाईचा नैवैद्य दाखवावा व त्या नैवेद्यात तुळशीची पाने ठेवण्यास विसरू नये. तुळस ठेवून दाखवल्या नैवैद्यामुळे भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात.

आपल्या कामत काही अडचणी येत असतील हातात घेतलेले काम जर पूर्ण होत नसेल तर श्री हरी विष्णूंना एक नारळ व पाच बदाम अर्पण करावेत ह्यामुळे आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपले काम यशस्वी होते. एकादशीच्या दिवशी आपण पिवळी वस्त्रे धारण करावीत, पिवळे धान्य, पिवळी फुले, पिवळी मिठाई श्री हरी विष्णूंना अर्पण करून त्या वस्तू आपण गोरगरिबात वाटाव्यात ह्यामुळे श्री हरी विष्णूंची कृपा आपल्यावरती होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर आपल्यावरती कर्ज खूप झाले असेल तर त्यावर उपाय म्हणून पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करून त्या झाडाखाली दिवा लावावा कारण पिंपळाच्या झाडात विष्णूंचा वास असतो आणि ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास साक्षात श्री हरी विष्णूंचे पूजन केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *