स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचे पदार्थ कोणते आहेत? स्वामींना कोणता नैवेद्य दाखवावा?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो सर्व सेवेकरांच्या आणि स्वामी भक्तांच्या मनामध्ये सारखा एक प्रश्न येत असतो. तो म्हणजे महाराजांच्या आवडीचे पदार्थ कोणते आहेत. ते जेवणातले कोणकोणते पदार्थ आवडीने खात असतील. आणि आम्ही कोणता आणि कसला नैवेद्य करावा. तो नैवेद्य महाराजांना आवडेल ते आमच्यावर प्रसन्न होतील. तसे तर प्रत्येक देवांचे गुरूंचे कोणते ना कोणते आवडीचे पदार्थ असतात. आणि त्यानुसार आपण ते पदार्थ करून त्या देवांना त्याचा नैवेद्य दाखवत असतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे देखील आवडीचे पदार्थ आहेत.

बेसनाचे लाडू पुरणपोळी हे दोन गोड पदार्थ स्वामींना अत्यंत प्रिय पदार्थ आहेत आणि तिखट पदार्थ म्हटला तर कांदा भजी आणि कडबोळी हे दोन पदार्थ देखील महाराजांना खूप आवडतात. आपल्याला जर स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचा असेल, तर पुरणपोळी खीर कांदा भजी किंवा पुरणपोळी, आमरस, कांदाभजी, आमटी, भात, पापड असा परिपूर्ण नैवेद्य आपण महाराजांना दाखवू शकतो. हे झाले स्वामींच्या आवडीचे पदार्थ मात्र महाराज ताटामध्ये कधीच बघत नाहीत. की नैवेद्यासाठी आपल्याला ताटामध्ये काय दिलेले आहे.

ते फक्त भक्ताचा भाव आणि त्याचे श्रद्धा त्याचा विश्वास हे पाहतात आपण स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी जो काही पदार्थ तयार करणार आहोत. तो पदार्थ तयार करत असताना आपल्या मनामध्ये असलेला भाव, आपला आनंद आणि आपली एकनिष्ठता हे महाराज बघतात. आणि महाराजांसाठी जो आपण प्रेमाने आणि मनोभावाने पदार्थ करू तो पदार्थ महाराज आनंदाने खातात. मग त्यामध्ये दहीभात असेल, वरण-भात असेल, दही पोहे असतील, चपाती भाजी असेल, भाजी भाकरी असेल जे काही शाकाहारी जेवण आपण स्वतःसाठी बनवलेले आहे

तेच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचे आहे. आणि काहीच केलेले नसेल तर दूध भात, दूध चपाती याचा देखील नैवेद्य दाखवला तरी चालतो. भाव आणि आपला आदर प्रेम हे खूप महत्त्वाचे असते महाराज कोणते पदार्थ केले आहेत. ते किती महागडे आहेत हे पाहत नाहीत. त्या पाठीमागे असणारा आपला भाव आपला आनंद ते पाहतात. त्यामुळे निखळ मनाने आपण जे काही बनवू ते महाराज खातात भाव ठेवून कोणताही पदार्थ बनवा. ते सर्व पदार्थ महाराजांना आवडतात. आणि आपण जे काही करू ते सर्व स्वामींच्या आवडीचे पदार्थ होतील.

असे नाही की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू पुरणपोळीचा नैवेद्य करून दाखवायला पाहिजे. हा कोणता तरी खास दिवस आहे सोमवार आहेत. किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या पारायणाची उद्यापन आहे. अशावेळी मात्र आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना गोड पदार्थांची नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जर आपल्याला जमत असेल तर बेसनाचे लाडू याचा देखील नैवेद्य करून दाखवावा. किंवा आपण कांदा भजी चा देखील नैवेद्य दाखवू शकतो. हे करणे बंधनकारक नाही ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे.

स्वामींना भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पंचपकवानाचे ताट लागते असे काही नाही. साधा वरण-भात दूधभात खाऊन देखील महाराज आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.कधीच असा विचार करू नका. की स्वामींना कोणते पदार्थ आवडतील असतील आणि आपण स्वामींना कोणता पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आपण जे काही प्रेमाने बनवून ते महाराजांना नैवेद्यासाठी चालते. स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत. त्यांना भक्तीने मायेने आपण जे काही देऊ ते सर्व महाराज स्वीकारतात. त्यामुळे कोणताही पदार्थ नैवेद्यासाठी करत असताना मनामध्ये भाव आणि प्रेम असायला हवे, प्रेमाने आणि भक्तिभावाने केलेला कोणताही पदार्थ महाराजांना आवडतो.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *