10 जुलै आषाढी एकादशी : एक नारळ करेल तुमचे सर्व दुःख दूर, घरात येईल श्रीमंती !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो 10 जुलै ला देवशयनी आषाढी एकादशी आहे, ह्या एकादशीला महाएकादशी असेही म्हणतात. या एकादशीला काही सोपे असे उपाय करू शकतो , या उपायाने ध्यानामध्ये वृद्धी होते आणि आरोग्याचे लाभ सुद्धा मिळतात आणि मित्रांनो हि वर्षाची सर्वात मोठी एकादशी मानली जाते, देवशयनी एकादशी तसेच महा एकादशी असेही म्हणतात. हे अगदी सोपे उपाय आहेत जे कोणी हि सहज करू शकतात. 10 जुलै च्या दिवशी एकादशीच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा. चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय आणि त्याने काय लाभ होणार आहे.

तुम्हाला केसर दूध घ्यायचे आहे. म्हणजे दुधामध्ये केसर टाकून त्या दुधाने विष्णू देवांना अभिषेक करावा . तुमच्या घरात विष्णू किंवा कृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला केसर दुधाने अभिषेक करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील म्हणून हा उपाय करावा. आणि त्याचबरोबर मित्रांनो एकादशीच्या दिवशी विष्णू देवाला आणि लक्ष्मी मातेला खीर किंवा सफेद रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावा. ह्या उपायाने सुद्धा देवता प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. विष्णू देवांच्या किंवा श्री कृष्णाच्या मंदिरात एकादशीच्या दिवशी जात असाल तर तिथे नारळ दान करावा. बिना फोडता नारळ मंदिरात ठेवायचा आहे.

आणि मित्रांनो तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या सर्व बोलून हा नारळ ठेवायचा आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि मित्रांनो एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक काम नक्की करायचे आहे ते म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर तुळशी असते , त्या तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे , हा दिवा लावल्यानंतर तुळशीला ११ प्रदक्षिणा घालायच्या आहेत . प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ११ वेळा ओम वासुदेवाय नमः असा मंत्राचा जाप करायचा आहे आणि मित्रांनो या नंतर अजून एक उपाय आहे म्हणजे तुमच्या घरात जर शंख असेल तर त्या शंखामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्याने विष्णू देवांचा अभिषेक करायचा आहे.

मित्रांनो हे फक्त एकादशीच्या दिवशी करायचे आहे , आणि त्याचबरोबर मित्रांनो जर या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा नारळा संबंधित चा छोटासा उपाय जर तुमच्या घरामध्ये केलात तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील बाधा पीडा आणि नकारात्मक गोष्टी निघून जातात. आरोग्य सुधारते , धन प्राप्ती होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. हे उपाय नक्की करून पहा , मनोभावे उपाय केल्याने त्याचे लाभ प्राप्त होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *