नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण आषाढी एकादशी दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत पूजा व उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच अनन्यसाधारण महत्वव आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला महाएकदाशी म्हणतात. आषाढी एकादशी हे भगवान विष्णूंचे व्रत आहे, ह्या एकादशी दिवशी विष्णुरूपी विठ्ठलाची प्रार्थना केली जाते. ह्या वेळी आषाढी एकादशी 10 जुलै रविवारी अली आहे आणि मित्रांनो वर्षभरातील मोठ्या एकादशीमध्ये हि एक एकादशी मानली जाते ह्या आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरु होतो, ह्या काळात देव निद्रेस जातात.
ह्या एकादशीला देव शयनी एकादशी देखील म्हणतात. तर मित्रांनो ह्या वर्षी हि एकादशी 10 जुलै रविवारी दिवशी आहे. आपण ह्या दिवशी व्रत करावे ह्या दिवशी व्रत केल्याने आपली सर्व पापे धुतली जातात अशी मान्यता आहे. जर आपल्याला ह्या दिवशी व्रत करणे शक्य नसेल तर आपण ह्या दिवशी काही छोटे उपाय करू शकता जेणेकरून तुम्हाला आषाढी एकादशीचे फळ प्राप्त होईल. आषाढी एकादशीला भगवान विष्णूंना पांढुरंगाला केशर मिसळलेल्या दुधाने अभिषेक घालावा ह्यामुळे आपली सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरामध्ये सूक्ष्मृती यावी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू घेऊन यायचे आहे की ती वस्तू आपण घरामध्ये आणल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपली सुटका करेल तर मित्रांनो चला तर जाणून घेऊयात कोणत्याही ती वस्तू आणि कशा पद्धतीने आपल्याला ती वस्तू आपल्या घरामध्ये या एकादशीच्या दिवशी आणायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती.
मित्रांनो या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजातील आवरून आपल्याला पूजेचे साहित्याच्या दुकानांमध्ये जाऊन एक पूजेची सुपारी आणि दोन विड्याची पाने आणायचे आहेत मित्रांनो या दोन वस्तू आपल्याला पूजेचे साहित्याच्या दुकानांमधून या दिवशी आणायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच ते आपल्या घरामध्ये आणल्यानंतर आपल्या देवघरामध्ये बसून त्याचे पूजन करायचे आहे आणि त्यानंतर त्या सुपारीकडे आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी राहावे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही एक पूजेची सुपारी आणायची आहे आणि त्याचे अगदी मनापासून पूजन करायचे आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. एकादशीच्या दिवशी आपण तुळशीसमोर संध्यकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि दिवा लावल्यानंतर ओम वासुदेवाय नमः ! ह्या मंत्राचा जप ११ वेळा करत आपण तुळशीला प्रदिक्षणा घालाव्यात. असे केल्याने घरात सुख शान्ति राहते, आणि आपल्या घरात येणारी संकटे टळतात. ह्या एकादशी दिवशी दक्षिणावर शंखामध्ये पाणी भरून त्या पाण्याने आपण विष्णूंचा अभिषेक करावा. असे केल्याने धनवृद्धी होते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.