नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो 13 जुलै 2022 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि हा स्वामींचा अगदी खास दिवसही मानला जातो. त्याचबरोबर आपल्या अनेक स्वामीभक्त या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतात. त्याचबरोबर या दिवसांमध्ये काही स्वामीभक्त गुरुचरित्र पारायणाचे वाचन करत असतात आणि त्याच बरोबर स्वामींच्या केंद्र मध्ये जाऊन स्वामींच्या विविध सेवाही करत असतात कारण मित्रांनो या दिवसांमध्ये जर आपण स्वामींची पुजा, सेवा स्वामींचे काही उपाय केले तर यामुळे स्वामी आपल्यावर लगेच प्रसन्न होतात.
मित्रांनो आज आपण स्वामींचा असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण गुरुपौर्णिमे दिवशी केला तर यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर स्वामी कायम आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपल्या वर आलेल्या संकटात पासून आपले रक्षण करतील, चला मित्रांनो पाहुयात कोणता आहे हा उपाय जो आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये स्वामींचा एक लाल दोरा बांधायचा आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त यासाठी लाल रंगाचा दोराच हवा. दोरा तो जो पूजेचा असतो रंगीबेरंगी असतो. दोन तीन रंगात मिळतो तो दोरा तुम्हाला पूजा सामग्री त्या दुकानातून आणायचा आहे. तर तुमच्या घरातच असेल तर तोच दोरा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता.आता हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता. फक्त तुम्हाला थोडा दोरा तोडून तो देव घरात ठेवायचा आहे. थोडा दोरा म्हणजे जेवढा आपल्याला आपल्या हाताला बांधायचा आहे. तेवढा दोरा तोडून आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे.
मित्रांनो आपल्याला गुरु पौर्णिमेच्या आदल्या दिवशी छोटीशी पूजा करून घ्यायचे आहे ही पूजा करताना सर्वात आधी हळदी-कुंकू व अक्षता फुले वाहून त्या दोऱ्याची पूजा करावी त्यानंतर अगरबत्ती ओवळावी आणि दिवा लावावा. हे झाल्यानंतर आपल्या हातात उजव्या हातात घ्यायचा आणि ११ वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हा मंत्र ११ वेळेस बोलावा.
तो मंत्र बोलून झाल्यानंतर तो दोरा पुन्हा देवघरात ज्या ठिकाणावरून उचलला होता त्याच जागी ठेवून द्यायचा आणि दिवसभर रात्रभर तो दोरा तिथेच देवघरात राहू द्यायचा. तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून देवपूजा झाल्यानंतर तो दोरा तुमच्या हातामध्ये बांधायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने जर गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून स्वामींच्या मंत्राचा जप करून तुम्ही जर लाल रंगाचा दोरा आपल्या हातामध्ये बांधला तरी यामुळे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांपासून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील.
म्हणूनच मित्रांनो गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही तुमच्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा नक्की बांधा आणि जर तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांना दोरा बांधायचे असेल तर तेवढे दोरे कापून तोडून तुम्ही देवघरात ठेवावे आणि तेवढ्या दोऱ्यांची पूजा करावी.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.