नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते. या नक्षत्रातील प्रमुख देवता बृहस्पती देव आहेत. जे देवांचे गुरु आहेत. हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त होतात.
जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी जर आपण स्वामी समर्थांची विशेष पूजा या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांना आवडणारा पदार्थ नैवेद्य म्हणून जर आपण त्यांना या दिवशी दाखवला तर यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील.
मित्रांनो सर्वात आधी आता आपण जाणून घेऊया की कोणता नैवेद्य आपल्याला या शुभ दिवशी स्वामी समर्थ ना दाखवायचा आहे त्याबद्दल ची माहिती तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला या दिवशी आपण दररोज करतो तशी देवपूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या विशेष दिवशी आपल्याला स्वामींची विशेष सेवा सुद्धा करायचे आहे.
या सेवेमध्ये स्वामी नामाचा जप आणि त्याचबरोबर तसेच ज्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांचे स्तोत्र किंवा दत्त महाराजांची बावनी तुम्ही वाचू शकता जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांचे दत्त बावनी पाठ एक वेळा तरी करा व कमीत कमी दत्तबावनी चे ६१ पाठ जर तुम्ही करू शकत असाल तर नक्की करा याचा खूप चांगला फायदा होतो.
मित्रांनो अशा पद्धतीने स्वामी सेवा झाल्यानंतर आपल्याला स्वामींना आवडणाऱ्या गोष्टीची म्हणजेच पुरणपोळी किंवा गोड खीर यापैकी कोणताही एक पदार्थ नैवेद्य म्हणून या दिवशी स्वामींना दाखवायचा आहे मित्रांनो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळची वेळ कोणत्याही वेळी तुम्ही हा पदार्थ स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवला तरी चालेल.
परंतु मित्रांनो याच दिवशी तुम्हाला हा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याच बरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण या दिवशी अनेक वेगवेगळे उपाय करू शकतो आणि आपल्या समस्या दूर करू शकतो.
मित्रांनो गुरुपुष्यामृत या नक्षत्रावर या दिवशी तुम्ही आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा असतो त्या उंबरठ्यावर गोमूत्र व हळद याचा पट्टा ओढायचा आहे. मित्रांनो गोमूत्र आणि हळद मिक्स करून त्या मिश्रणाचा पट्टा आपल्या मुख्य उंबरठ्यावरती काढायचा आहे तसेच कुंकू आणि पाणी मिक्स करून दरवाजावरती स्वस्तिक काढायचे आहे. मुख्य दरवाजावर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. लक्षात घ्या दिवा हा आपल्या उजव्या हाताला रोज लागायचा आहे दरवाजातून बाहेर पडताना आपल्या उजव्या साईटला दिवा लावायचा आहे.
दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते. असे केल्याने व्यवसायाला गती मिळते. आर्थिक संकट दूर होते. नोकरी मिळविण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करू शकता. गुरु पुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखची पूजा करावी. या शंखला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे. असे केल्याने लवकरच अडकलेले पैसे मिळतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.