‘या’ फुलाच्या दर्शनाने उजळेल आपले भाग्य आणि पूर्ण होतील आपल्या सर्व इच्छा !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो तुम्ही कधी ब्रह्मकमळ पाहिले आहे का, किंवा ब्रह्मकमळाचे रोप आपल्याकडे आहे का. ब्रह्मकमळ हे फुलाची प्रजाती असून याला ऐतिहासिक त्याच बरोबर धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. पार्वती मातेच्या विनंती वरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती. असे शिवपुराणात सांगितले आहे. ज्यावेळी महादेवाने गणपतीचे शीर धडावेगळे केले आणि माता पार्वती च्या सांगण्यावरून ते पुन्हा गणपतीच्या शीर त्यावेळी ब्रह्म कमळाच्या फुलाचा उपयोग केला आहे असे पुराणात म्हटले आहे. ब्रह्मकमळाचे फुल जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उगवतात.

मुळातच ब्रह्मकमळाचे फूल हे हिमालयाच्या पर्वत रांगेतील फुल आहे. ज्यावेळी ब्रह्मकमळाचे फूल उमलते त्यावेळी त्या फुलांमध्ये महादेवाच्या पिंडीचा आकार दिसतो. ब्रह्म कमळाच्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते. इतर फुलांच्या प्रमाणे हे फुल आपल्याला बाजारात सहज रित्या उपलब्ध होत नाही. इतर फुलांच्या प्रजातींवर फुले बारा महिने येतात. मात्र या फुलाचा कालावधी तीन महिन्याचा असतो. जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये ही फुले उगवतात ब्रह्मकमळाचे फूल भेट म्हणून देतात. किंवा महादेवाच्या पिंडीवर ब्रह्मकमळाचे फूल अर्पण करतात.

ब्रह्मकमळाचे फूल दिसायला सुंदर मोहक आणि ऐतिहासिक पूर्ण फुल आहे. त्याचबरोबर या फुलांमध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत. असे म्हटले जाते, की ब्रह्मकमळाचे फूल विकले किंवा विकत घेतले जात नाही. आपल्याला जर हे फूल कोणी भेट म्हणून दिले तरच ते लाभदायक असते. धार्मिक दृष्ट्या ब्रह्मकमळाचे फूल हे भगवान विष्णू नाभी पासून तयार झालेले फुल आहे, असे मानले जाते. आणि या फुलावर भगवान ब्रह्मा बसले आहेत. ब्रह्म कमळाचे फुल रात्रीच उमलते या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या वेळीच हे फूल उमलते. हे फूल जर आपण आपल्या मुख्य दरवाज्याला लावले, तर आपल्या घरांमध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही.

ब्रह्मकमळाचे फूल जर आपण घराच्या मुख्य दरवाजाला लावले, तर आपल्या घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. ज्यावेळी ब्रह्मकमळाचे फूल उमलते त्यावेळी त्या ब्रह्मकमळाच्या रोपाची पूजा केली जाते हळदी कुंकू अक्षता वाहिले जातात. निरांजन ओवाळतात अगरबत्ती लावतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने या रोपांची पूजा केली जाते. त्यानंतरच ते फुल तोडले जाते ते फुल देवाला अर्पण केले जाते. ब्रह्मकमळाचे फुल खूप छान पण तितकेच ते फूल पवित्र देखील आहे. आणि ज्यांच्या दारामध्ये ही फुले उमलतात ते लोक खूप भाग्यशाली असतात. ब्रह्म कमळाचे फूल दिसायला आकर्षक व सुंदर असते.

ब्रह्मकमळाचे फूल वर्षातून एकदाच येते. साधारणता संध्याकाळपासून फुल उमलण्याची सुरुवात होते. आणि मध्यरात्री पूर्णपणे हे फूल उमलते. ब्रह्मकमळ यामध्ये अशा औषधी गुणधर्म आहेत. की ते वाळून त्याचा वापर कॅन्सरसारख्या रोगाला बरे करण्यासाठी केला जातो.वाळलेल्या ब्रह्मकमळाचे फुल खाल्ले तर जुनाट खोकला देखील निघून जातो. ज्यावेळी ब्रह्मकमळ उमलते त्यावेळी त्याच्यामध्ये ब्रह्मदेव किंवा त्रिशूल अशा आकृत्या दिसतात. उत्तराखंडामध्ये ब्रह्मकमळा ब्रह्मकमळ म्हणून ओळखले जाते. तर काश्मीरमध्ये या फुलाला गलगल म्हणून ओळखले जाते.

ब्रह्मकमळ यामध्ये औषधी गुणधर्म खूप आहेत ताप आलेला असेल तर हे फूल खूप गुणकारी आहे.ज्या महिलांना युरीन इन्फेक्शन चा त्रास आहे. त्या महिलांसाठी ब्रह्मकमळाच्या फुलाचा अर्क खूप उपयोगी ठरतो. हाडांचे दुखणे असुद्या, सर्दी-पडसे असू द्या, यासारखे आजार पूर्णपणे बरे करण्याची क्षमता या फुलांमध्ये आहे. शरीरावर जखम झाली तर या पानांचा अर्क त्या जखमेला लावला तर ती जखम पूर्णपणे बरी होते. मात्र ब्रह्मकमळाचे फूल हे दुर्मिळ फुल आहे. त्यामुळे प्रत्येकालाच ते बघण्याचे भाग्य लागते असे नाही.

मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *