नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करतो. आणि त्यांची नित्यनेमाचे जी काही सेवा आराधना आहे. ती देखील करतो त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या आपण त्रिवार आरत्या देखील करतो. आरती करून झाल्यानंतर किंवा दररोज सकाळ संध्याकाळ आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवत असतो. हा नैवेद्य दाखवताना आपल्याला एक काम करायचे आहे. ते काम कोणते आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये आपण घेणार आहोत.
आपल्यापैकी बऱ्याच सेवेकऱ्यांना हे माहीत आहे की ज्यावेळी आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो. त्यावेळी आपण नैवेद्यासाठी जे काही पदार्थ केलेले आहेत. त्या पदार्थांमध्ये एक एक तुळशीचे पान ठेवायचे आहे. हे सर्वांना माहीतच आहे आणि अशा पद्धतीने दररोज आपण सकाळ-संध्याकाळ यामध्ये तुळशीचे पाने ठेवूनच स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवत असतो. दाखवत असताना तुळशीच्या पाना सोबतच आपल्याला अजून एक काम करायचे आहे. ते काम केल्याने आपण जो काही नैवेद्य केलेला आहे. तो स्वामी समर्थ महाराजांनी पर्यंत पोहोचतो.
ज्यावेळी आपण महाराजांसाठी नैवेद्याचे ताट तयार करतो त्यावेळी नैवेद्यामध्ये जे काही पदार्थ आहेत. त्यावर तुळशीचे पान ठेवतो, त्याच प्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये तुळशीचे पान घेऊन आपल्याला मंत्रांचा जप करायचा आहे. आपण जर या सहा मंत्रांचा जप केला तर तो आपला नैवेद्य पूर्ण होतो ते मंत्र असे आहेत.
1)ओम प्राणाय स्वाहा
2)ओम आपानाय स्वाहा
3)ओम व्यानाय स्वाहा
4)ओम उदानाय स्वाहा
5)ओम समानाय स्वाहा
6)ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा
आपण जर स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवताना नैवेद्य सोबतच या मंत्राचा जर जप केला तर महाराज आपले नैवेद्य स्वीकार करतील. आणि आपल्याला आशीर्वाद देतील आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ज्याप्रमाणे तुळशीची पाने ठेवल्याशिवाय कोणताही नैवेद्य पूर्ण होत नाही. एवढे या तुळशीच्या पानांना महत्त्व आहे. आणि आपण जर अशी तुळशीची पाने उजव्या हातामध्ये घेऊन वरील सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हटला तर, आपला नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांनी पर्यंत पोहोचेल. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल.
मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.