नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो कुंडलीमध्ये पितृ दोष असल्याने जीवनात नेहमी संकटे येत असतात, दु:ख येत असतात. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृ दोष आहे तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, पितृ दोष हा सर्वात मोठा आणि धोकादायक दोष मानला जातो. आयुष्यात अनेक चढउतार पाहायला मिळतात आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृ दोष आहे त्याला आयुष्यातील कोणत्याही कामात यश मिळत नाही. अनेक प्रकारच्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागते, पण असा कोणताही दोष नाही, ज्यावर उपाय नाही.
आणि मित्रांनो ज्योतिषशास्त्रात पितृ दोषाबाबत अनेक उपाय सांगितले गेले आहेत, ज्याचा अवलंब करून पितृ दोषाच्या प्रभावापासून मुक्तता मिळू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्योतिषांच्या मते, कुंडलीतील दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सातव्या, नवव्या आणि दहाव्या घरात सूर्य राहू किंवा सूर्य शनि युती झाल्यावर पितृ दोष होतो. जेव्हा सूर्य तूळ राशीत असतो किंवा राहू आणि शनीच्या जोडीला असतो तेव्हा पितृ दोषाचा प्रभाव वाढतो. तर लग्नेश सहाव्या, आठव्या, बाराव्या घरात असेल आणि राहू चढत्या राशीत असला तरी कुंडलीत पितृ दोष आहे.
परंतु मित्रांनो आज जो आपण उपाय आणि मंत्र पाहणार आहोत याचा जप जर आपण केला तर यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील आणि त्याच बरोबर आपल्या कुंडलीमध्ये जत पितृ दोष असतील तर तेही दूर होतील आणि आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतील चला जाणून घेऊ या कोणता आहे तो मंत्र आणि कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे या बद्दल ची संपूर्ण माहिती.
मित्रांनो हा उपाय आपल्याला ज्या वेळी आपण आपल्या वडील घरांचे श्राध्द करत असतो त्यावेळी करायचे आहे मित्रांनो आपले पितृ आपल्यावर प्रसन्न रहावेत आणि त्याच बरोबर त्यांची कोणतीही अपूर्ण राहिलेली इच्छा असेल यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नसेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण पिंडदान आणि शांत करत असतो तर मित्रांनो अशा वेळी आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या माणसांची श्राद्ध करत असताना ह्या मंत्राचा जप करायचा आहे, मित्रांनो शब्द करत असताना थोडा वेळ आधी तुम्ही जर या मंत्राचा तीन वेळा जप केला तर यामुळे तुमच्या कुंडली मध्ये असणारे सर्व पितृ दोष दूर होतील आमच्यावर प्रसन्न होतील.
मित्रांनो आपल्या घरामध्ये आपण ज्याप्रमाणे एखाद्या देवी-देवतांचे किंवा कुलदेवता चे मंत्र म्हणत असतो त्यावेळी आपल्याला असे सांगितले जाते की त्या देवीदेवतांच्या प्रतिमेसमोर किंवा कुलदेवतेच्या प्रतिमेसमोर बसून आपल्याला त्या मंत्राचा जप करायचा असतो आणि आपल्यातील बऱ्याच जणांना अशी शंका असेल की मग आम्ही या मंत्राचा जप आमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे फोटो समोर बसून किंवा पितरांचा समोरच बसून करायचा काम तर मित्रांनो जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये बसून किंवा एका शांत खोलीमध्ये बसून सुद्धा या मंत्राचा जप करू शकता आपल्या पितरांच्या फोटो समोरच बसून या मंत्राचा जप करणे तुम्हाला शक्य नसेल तरीही चालेल.
मित्रांनो तुमच्या घरा मध्ये ज्यावेळी तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी देवपूजा करताना किंवा विविध देवदेवतांच्या मंत्रांचा जप करत असतात त्यावेळी तुम्ही या मंत्राचा जप केला तरीही चालेल पण शक्यतो मित्रांनो या वेळी आपण ज्यावेळी आपल्या घरामध्ये पितरांचे श्राद्ध झालं असतं त्यावेळी करायचा आहे आणि वर्षभरामध्ये इतरत्र जेव्हा तुम्हाला वाटेल की आपले पितर आपल्यावर नाराज आहेत किंवा आपल्या कुंडलीमध्ये पितृ दोष निर्माण झालेला आहे तर अशा वेळी सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा एखाद्या खोली मध्ये बसून या मंत्राचा जप करू शकता.
चला तर मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे तो प्रभावी मंत्र
ॐ देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च | नमः स्वधायै स्वाहायै नित्यमेव नमोऽस्तुते || (भवन्तु ते)
मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला करते वेळी किंवा ज्या वेळी तुम्हाला पितृदोष आहे असे वाटेल त्यावेळी करायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.