देवांवर लावलेले फुलं आपल्या सामोर खाली पडले तर काय होते?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो भरपूर सेवेकऱ्यांचा प्रश्न होता की मंदिरात किंवा आमच्या देवघरात किंवा बाहेरच्या मोठ्या मंदिरामध्ये जेव्हा देवाच्या डोक्यावरून किंवा देवांच्या पुष्पहार मधून एखादे फूल समजा खाली पडले तर त्या फुलाचे करायचे आणि काय समझायचे आपण. घरामध्ये देवांच्या फोटोला किंवा देवाच्या मूर्तीला फुले लावली आहेत किंवा हार लावले आहेत तर आपण पूजा करत असताना एखाद फुल देवांच्या किंवा स्वामींच्या किंवा कोणत्याही देवीच्या देवांच्या मस्त का वरून खाली पडले तर त्या फुलाचे काय करायचे.

तर मित्रांनो पहिली गोष्ट तर तुम्ही एक लक्षात ठेवा की जेव्हा फूल खाली पडते तेव्हा ती शुभ घटना समजली जाते असे समजले जाते की देवांचा तो तुमच्यावर आशीर्वाद आहे त्यांची कृपा आहे पण प्रश्न पडतो की या फुलाचे करायचे काय तर मित्रांनो भरपूर सेवेकरी ते फुल तिजोरी मध्ये ठेवून देतात हे हि करणे चांगल आहे कारण तो देवांचा आशीर्वाद समजून आपण ते फुल तिजोरीमध्ये ठेवून द्यावे.

पण इथे नियम असा आहे किंवा मान्यता आहे की ते फुल आपण नदीमध्ये प्रवाहित करून दिले पाहिजे किंवा पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचे विहीर असेल तर विहीर मध्ये ते विसर्जित करायचे तलाव असेल तर तलावात किंवा समुद्र असेल तर समुद्रामध्ये विसर्जित करून द्यायचे कारण तिजोरीमध्ये आपण फूल ठेवले तर ते सुकून ,कुजून ते फुल खराब होणार आहे आणि हा अपमान समजला जातो.

म्हणून देवाचे फुल जे मस्तकावरून आपल्या समोर पडते तो देवाचा आशीर्वाद ती देवाची कृपा आपल्यावर असते असे समजून त्याला नमस्कार करावा प्रणाम करावा आणि तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावात विहिरीत समुद्रामध्ये त्याचे विसर्जित करून द्यावे.

या प्रकारे तुम्ही देवाच्या मस्तकावर ठेवलेल्या किंवा पुष्पहारा मधून पडलेल्या फुलाचे तुम्ही विसर्जन केले पाहिजे. ते फुल म्हणजे देवाचा आशीर्वाद च मानला जातो. तुम्ही जी काही इच्छा देवाकडे मागितली आहे ती नक्की पूर्ण होईल पण त्यासाठी देवावर श्रद्धा असणे आवश्यक आहे. पूर्ण भक्ती भावाने विश्वासाने तुम्ही देवावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.