स्वामींची लगेच फळ देणारी नित्य सेवा कशी करावी?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो स्वामी सेवा बरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं स्वामींची नित्य सेवा काय करावी कशी करावी यासारखे प्रश्न तुमच्या मनात पडत असतील. खरंतर स्वामी आपले गुरू आपल्या जीवनाचा आधार आहेत त्यामुळे प्रत्येक स्वामीभक्त प्रत्येक सेवेकरी आपल्या स्वामींच्या नित्य सेवेत आपले तन मन धन अर्पण करतो.

परंतु मित्रांनो आपल्यामध्ये असे अनेक भक्त आहेत ज्यांना अजूनही स्वामी समर्थांची नित्यसेवा कशा पद्धतीने करावी आणि त्याचबरोबर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वामींची सेवा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याबद्दल हि आपल्यातील अनेक जणांना अनेक प्रश्न पडलेले असतात तर मित्रांनो आज आपण याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला स्वामींची ही सेवा करण्यासाठी सकाळची किंवा संध्याकाळची एक वेळ ठरवून घ्यायची आहे, मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर शक्यतो सकाळच्या वेळी म्हणजेच ज्या वेळी तुम्ही आपल्या घरामध्ये देवपूजा करतात त्या देवपूजा नंतरच स्वामींची नित्य सेवा करावी आणि जर तुम्हाला काही कारणामुळे सकाळच्या वेळी सेवा करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही सायंकाळच्या वेळी ज्यावेळी देवघरामध्ये दिवा अगरबत्ती कराल त्यावेळी सुद्धा ही स्वामी सेवा केली तरीही चालेल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही स्वामींची सेवा केली तरीही चालेल मित्रांनो घरांमध्ये असणाऱ्या मुलांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी त्याच बरोबर महिलांनी आपल्या घरात मधील सुख-समृद्धीसाठी आणि असणाऱ्या पुरुषांनी व्यवसायात आणि नोकरी मध्ये वाढ होण्यासाठी ही सेवा करायची आहे. मित्रांनो ही सेवा करत असताना तुम्हाला स्वामींच्या प्रतिमेची मूर्तीची आवश्यकता आहे मित्रांनो जर तुमच्याकडे स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा ही सेवा करू शकता परंतु स्वामींची प्रतिमा असणे हे गरजेचे आहेत.

मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर स्वामींची सेवा सुरू करत असताना सर्वात आधी महाराजांचे नामस्मरण याला प्राधान्य द्यावे. नित्य सेवा करत असताना नित्यनेमाने ११ माळ जपा आणि शक्य नसेल तर १०८ वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करत माळ जपा.

होत असेल तर श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे पाठुपद म्हणजेच क्रमशः १,२,३ अध्याय वाचा. आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामिनी दाखवायच्या नेवेद्य तर मित्रांनो रोज जे आपण खातो ते महाराजांना द्या. त्यांची रोज नैवेद्य आरती करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले विचार स्वच्छ ठेवा. मास मच्छी खाऊ नका. मोठ्यांचा आई वडिलांचा आधार बना, आदर करा, वेळ मिळेल तिथे श्री स्वामी समर्थ असा जप करा. सुख, शांती, संपत्ती, आरोग्य आपल्यापासून कधीच दूर होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *