नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, तसे करू नये, असा सल्ला दिला जातो. सन २०२२ मध्ये १४ जून मंगळवार रोजी वट पौर्णिमा आहे आणि मित्रांनो वटपौर्णिमा सणाला वडाच्या झाडाला महत्व आहे.
आणि त्याचबरोबर वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते.
आणि वडाच्या पारंब्या सारख्याच जन्मोजन्मीच्या गाठी ह्या बांधलेल्या असतात. परंतु मित्रांनो आपल्यातील अनेक महिलांना असा प्रश्न पडलेला असतो की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर आणि कधी वडाची पूजा आम्ही केली तर त्यामुळे आम्हाला त्या पूजेचा लाभ होईल आणि आमची पूजा व्यवस्थित रित्या संपन्न होईल तर मित्रांनो यासाठी महत्त्वाची माहिती अशी आहे की वटपौर्णिमा 13 जून सोमवारच्या दिवशी रात्री नऊ नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 जून मंगळवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे आणि या कालावधीमध्ये सर्वात शुभमुहूर्त हा मंगळवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी साडेबारापर्यंत असणार आहे.
म्हणूनच मित्रांनो 14 जून मंगळवार या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी साडेबारा पर्यंतचा काळ हा शुभ असल्यामुळे या वेळे मध्येच स्त्रियांनी वडाच्या झाडाचे पूजन करायचे आहे.आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी वटपौर्णिमा व्रत पाळणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर आंघोळ करून कोणत्याही शुभ रंगाचे कपडे परिधान करावे. सावित्री, सत्यवान आणि यमाची मातीची मूर्ती वटवृक्षाखाली स्थापित करावी. या मुर्त्यांसह वडाची पूजा करावी. यानंतर झाडाभोवती कच्चे सूट गुंडाळून ३ परिक्रमा कराव्या. या दिवशी सत्यवान सावित्रीची कथा अवश्य ऐकावी.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.