घरावर संकट आल्यास ‘इथे’ लावा 1 दिवा : संकट टळेल : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा-जेव्हा एखादं मोठं संकट येणार असतं तेव्हा तेव्हा आपली वास्तु म्हणजेच आपलं घर विशिष्ट प्रकारचे संकेत देऊ लागत. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अस्वस्थ वाटत असेल, एक प्रकारची अस्वस्थता जाणवत असेल तर लक्षात घ्या आपली वास्तू येणाऱ्या संकटाला आपल्याला काहीतरी संकेत देत आहे.

अशावेळी या अपरिचित असणाऱ्या, माहिती नसणाऱ्या संकटापासून आपला आणि आपल्या कुटुंबीयांचं रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकता. हजारो वर्षांपासून भारत देशात हा उपाय केला जात आहे.

मित्रांनो यासाठी आपल्याला केवळ इतकंच करायचं की आपल्या देवघरासमोर एक नंदादीप प्रज्वलित करायचा आहे. नंदादीप याचा अर्थ 24 तास प्रज्वलित राहणारा, तेवत राहणारा दिवा. मित्रांनो हा दिवा नक्की कधी लावावा ? कसा लावावा ? कोणत्या दिशेस लावावा ? त्याची वात कुठे असावी आणि यासंबंधीची काही महत्वपूर्ण नियम काय आहेत ही संपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

मित्रांनो मी पहिली गोष्ट सांगितली नंदादीप याचा अर्थ 24 तास अखंड जळणारा दिवा. हा दिवा आपण तिळाच्या तेलाचा लावायचा आहे. तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानात किंवा पूजेच्या दुकानात हे तिळाचं तेल अगदी सहज उपलब्ध होईल. नसेल तर कुठल्याही बाजारात आपणाला हे सहज मिळेल. हिंदू धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात या तिळाच्या तेलाचा फार मोठं महत्त्व सांगितले आहे. मित्रांनो अशा या तिळाच्या तेलाचा नंदादीप आपण प्रज्वलित करायचा आहे.

आपल्या देवघरासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला लगोलग दिसेल, ताबडतोब दिसेल की तुमच्या घरातील अस्वस्थता दूर झालेली आहे आणि हळूहळू घरात शांतता प्रस्थापित होत आहे. अनेक लोकांना याची अनुभूती, याची प्रचिती आलेली आहे. हे जर यदाकदाचित वाऱ्याने किंवा इतर कारणांनी हा नंदादीप हा दिवा विझला तर काळजी करू नका. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंकाकुशंका न आणता आपण पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. पुन्हा दिवा लावल्यानंतर त्याला मनोभावे नमस्कार करावा.

मित्रांनो नमस्कार का करायचा ? हिंदू धर्मशास्त्रात दिवा म्हणजे प्रत्यक्ष देव स्वरुपात दिला आहे किंवा तो प्रत्यक्ष निर्माता’-भाग्यविधाता आहे आणि म्हणून अशा या दिव्याला आपण नमस्कार करावा. मित्रांनो दिवा लावण्यापूर्वी या दिव्याखाली काही ना काही आसन अवश्य असावे.

जसे मी सांगितले की देवा ईश्वराचे रूप आहे आणि म्हणून ईश्वराला बसण्यासाठी आपण आसन ज्याप्रकारे देतो अगदी त्याच प्रकारे या दिव्याखाली फुलाच्या पाकळ्या असतील किंवा झाडाची पाणी असतील किंवा एखादं पात्र असेल. जर काहीच नसेल तर आपण मूठभर तांदळाच्या ढिगावर हा दिवा लावला तर अतिउत्तम मानलं जातं. दिवा कधीच जमिनीवर किंवा खाली ठेवू नये. त्या खाली प्लेट वगैरेसुद्धा ठेवू शकता.

मित्रांनो नंदादीप आपण संकट दूर करण्यासाठी प्रज्वलित करणार आहात. त्याची वात कुठे असावी ? दोन दिशा अत्यंत शुभ मानल्या जातात. पहिली दिशा उत्तर दिशा आणि दुसरी दिशा पूर्व दिशा या दोन पैकी कोणत्याही दिशेला आपण या नंदादीपाची वात करू शकता.

असं म्हणतात की या दिशेला जर आपण वाद केली तर त्या योगी वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींना सुख प्राप्त होतं सोबतच दीर्घायुष्याची सुद्धा प्राप्ती होते म्हणजे त्या घरात राहणारे लोक हे अकाल मृत्यु व यापासून दूर राहतात त्यांना अकाली मृत्यूचे भय राहात नाही. दीर्घायुष्याची प्राप्ती होते.माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे घरात पैशाची बरकत होत राहते.

मित्रांनो या नंदादिपचे तोंड चुकूनही दक्षिण दिशेला करू नका किंवा पश्चिम दिशेला सुद्धा करण टाळा व ते हानिकारक मानले जात. जर आपल्याला असं वाटलं की घरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी आलेली आहे खूप मोठमोठी संकटे येऊ शकतात असा तुम्हाला एक पक्का तुमचा ग्रह झालेला आहे तर मित्रांनो अशा वेळी आपल्या घरातील चारही कोपर्‍यात चार दिशा आहेत.

या चारही दिशांना चारही कोपऱ्यात आपण चार दिवे प्रज्वलित करावे व पाचवा दिवा आपल्या देवघरासमोर आपण प्रज्वलित करावा. जे जे काही दोष आहेत येणारी संकटे आहे ती नष्ट होतील. वास्तूमध्ये सुख सौभाग्य वास करू लागेल.

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्र असं मानतो की, ज्या घरात दिवा तेवत ठेवला जातो त्या घरात आनंदाची निर्मिती होते सुख-शांती त्या घरात निर्माण होते. काही लोक म्हणतात की आमच्या घरामध्ये आता विजेचे दिवे आले आहेत. मॉडर्न सायन्स आहे.

मित्रांनो विजेचा दिवा इलेक्ट्रिक असतात. ते तेलाच्या दिव्याची किंवा तुपाच्या दिव्याची बरोबरी करू शकत नाहीत. या दिव्यातून किरणे बाहेर पडतात ही किरणे आणि आपल्या इलेक्ट्रिक बल मधून बाहेर पडणारी किरणे याच्यामध्ये जमीन – अस्मानाचा फरक असतो.

आपण जे दिवे प्रज्वलित करत असतो या दिव्यातून एक प्रकारच्या सात्त्विक लहरी बाहेर पडत असतात की ज्या नकारात्मक शक्तीना बाहेर ठेवतात.

तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा अशाप्रकारे शंका येईल की आपल्या घरावर बाधा येत आहेत काही संकटे निर्माण होऊ शकतात हा छोटासा उपाय अवश्य करा.

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच मिळालेल्या विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धांशी संबंध जोडू नये ही विनंती.

घरातील वेगवेगळ्या समस्या, नोकरी मधील अडचणी, घरावरील संकटे, या शिवाय लक्ष्मी प्राप्तीचे विविध उपाय यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.