नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो मोठा गुरुवार आपल्या स्वामींचा आपल्या गुरूंचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांना गुरुवार हा अतिप्रिय वार आहे. आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींचे विशेष सेवा केली जाते त्याचबरोबर त्यांना विशेष नैवेद्य व त्यांची विशेष आरती देखील केली जाते आपण दररोज स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो मंत्रांचा उच्चार करत असतो. मात्र विशेष मंत्र हे आपण सणावाराच्या दिवशी म्हणत असतो.
मित्रांनो गुरुवारी दिवसभर या विशेष मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि नऊ जून हा मोठा गुरुवार असल्याकारणाने या दिवशी देखील आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. आणि विशेष मंत्राचा जप देखील करायचा आहे. ही सेवा लहान-मोठे स्त्री-पुरुष असे कोणीही करू शकते. या सेवेमध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात.
फक्त आपल्याला 9 जून गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या विशेष मंत्राचा जप करायचा आहे. जप करण्यापूर्वी आपल्याला आपले हात-पाय स्वच्छ धुवायचे आहेत स्वच्छ हातपाय धुऊन झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून दिवा अगरबत्ती लावायची आहे.
आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याला दोन्ही हात जोडून मनापासून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान बरकत सर्वकाही मिळू दे. त्याचबरोबर आपल्याला करिअरमध्ये यश मिळू दे, उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना दोन्ही हात जोडून करायचे आहेत. दुःख, दारिद्र्य, संकट दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना म्हणत असताना मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असायला हवी.
प्रार्थना म्हणून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे की ‘ओम ओमकारवासीने नमः’ हा मंत्र आपल्याला गुरुवार च्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे म्हणायचा आहे. हा मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचं आहे.
हा मंत्र 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही, फक्त आपल्याला 21 वेळा हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीपुढे किंवा फोटो पुढे म्हणायचं आहे. मंत्राचा जप करत असताना कसल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही. अगदी सावकाश आणि शिस्तीत या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मंत्रजप करत असताना मनामध्ये श्रद्धा निष्ठा आणि भाव या तिन्ही गोष्टी असायला हव्यात. ज्यावेळी या मंत्राचा आपण जर जप केला तर आपल्या इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.
ज्यावेळी आपण गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या विशेष मंत्राचा जप करू त्यावेळी स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. त्यासोबतच आपल्यावर व आपल्या घरातील सदस्यांवर आलेल्या सर्व अडचणी दूर करतील. आपल्याला सर्व संकटांपासून दुःखांपासून सुटका करतील आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद समृद्धीने सर्वकाही येईल. त्याने मुळे 9 जून 2022 गुरुवारच्या दिवशी चे स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा विशेष मंत्र म्हटल्याने स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.