सोमवारी महादेवाची पूजा करताना करा ‘हे’ तीन उपाय : यशच यश लाभेल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शिवशंकर हे अत्यंत भोळे मानले जातात. सांसारिक दुःख निवारण्यासाठी महादेवाची पूजा केली जाते. भावपूर्ण आणि मनःपूर्वक श्रद्धेने भगवान शंकरांची आराधना केल्यास मनःशांती लाभते आणि व्यवहारातील दोषही दूर होतात.
सुखाचा मार्ग दाखविणा-या या देवाची उपासना करण्याचा मुख्य दिवस म्हणजे सोमवार.

मित्रांनो सोमवारी केलेली भोळ्या शंकराची पूजा अनेक मनोकामना पूर्ण करणारी ठरते. त्यासाठी महादेवाच्या पूजा तीन विशेष उपाय आणि शिवमंत्रासोबत पूर्ण केली तर तुमचा भाग्योदय अर्थात मनपसंत जोडीदार, नोकरी, व्यवसायातील प्रगती किंवा तुम्ही केलेल्या संकल्पापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. याशिवाय घरात शांती येते. सुख समृद्धी नांदते.

कोणते उपाय आणि मंत्र
मित्रांनो, पहाटे लवकर उठून स्नान आदी आटोपून झाल्यानंतर सोमवारी केवळ एकवेळ रात्रीच्या भोजनाचे व्रत करावे. म्हणजेच सोमवारी उपवास करावा. त्यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल स्नान करावे. जल स्नान आणि पुढील तीन उपाय करत असतांना खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा. जेणेकरून आपण करत असलेल्या उपाय सार्थक ठरेल.

ऊँ महाशिवाय सोमाय नम:
स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला विशेषतः गाईचे दूध अर्पण करावे. यामुळे तन, मन आणि धन यात निर्माण होणा-या कलहांची शांती होईल. आपणाला यश लाभेल.

भगवान शंकर म्हणजेच महादेवाला मधाची धार अर्पण करावी. अशी धारणा आहे की, त्यामुळे आयुष्यातील नोकरी आणि व्यवसायासंबधीच्या समस्यांचा अंत होतो. कितीही मोठा समस्या असतील तर त्या चुटकीसरशी कमी होतात.

त्यानंतर मित्रांनो, जल स्नान करुन महादेवाला लाल चंदन लावावे किंवा श्रुंगार करावा. चंदनाचा गुणधर्म शितलता हा आहे. त्यामुळे अशी धारणा आहे की, शिवाला चंदन चढविल्याने आयुष्यातही शांती आणि सुख-समृद्धी नांदते.

मित्रांनो, शिव अराधनेतील या तीन उपायनंतर यथाशक्ती गंध, अक्षता, फुल, नैवेद्य दाखवावा आणि पूजा करावी. यासोबतच शिवलिंगाला अर्पण केलेल्या दूध आणि मधाच्या चरणामृताचा प्रसाद ग्रहण करावा आणि भाळी चंदन लावून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी.

मित्रांनो आपल्याला माहिती आहे भगवान शिवशंकर हे एकदम साधे भोळे आहेत. हे उपाय करताच आपणाला ते तात्काळ प्रसन्न होतील. आपण करत असलेल्या सर्व कामांमध्ये यश प्राप्त होईल. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. त्यामुळे सुख समृद्धी नांदेल. मुलेबाळे तंदुरुस्त राहून शिक्षणात प्रगती करतील. ज्येष्ठांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. घरातील आजारपण याचबरोबर नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. आपल्या घराची प्रगती होईल.

भगवान शंकरांच्या विविध माहिती व करावयाच्या उपायांचा संदर्भात माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि इतरांना माहितीसाठी शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *