नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो नोकरी-व्यवसाय घराची प्रगती सुख-समृद्धी हे सर्वांना हवे असतेच. यासाठी स्वामी समर्थ महाराजांची ही 21 दिवसांची सेवा आहे. तशी तर महाराजांची ही सेवा एकवीस दिवस, एक महिना, तीन महिने, सहा महिने एक वर्ष करू शकतो. मात्र आजच्या धावत्या युगामध्ये प्रत्येकालाच वेळ असतो असे नाही. म्हणून कमीत कमी 21 दिवसांची स्वामींची सेवा आपल्याला करायचे आहे.21 दिवसांची सेवा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा निष्ठा भाव असायला हवा. कारण 21 दिवसाची सेवा जर आपण मनोभावे केली तर 21 दिवसांच्या आतच किंवा 21 दिवसानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर जर आपण ह्या सेवा एक महिने, तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभर केला तर याचे चांगलेच फळ आपल्याला मिळेल आणि असं चांगले अनुभव देखील आपल्याला मिळतील.
ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा घेतो त्यावेळी त्याचे फळ स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात. आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि याचे अनुभव स्वतः आपल्याला येतात. जर आपल्याला नोकरीत प्रगती, व्यवसायात वृद्धी व घरामध्ये सुख समाधान समृद्धी हवी असेल तर स्वामी समर्थ महाराजांची ही 21 दिवसांची सेवा करायला हवी. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणती आहे. आणि ती कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांची ही 21 दिवसाची सेवा करत असताना गुरुवारचा दिवस निवडायचा आहे. गुरुवारच्या दिवसापासून या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. ही सेवा करत असताना आपल्याला वेळ देखील निश्चित करावा लागणार आहे.
ही सेवा सुरू करत असताना गुरुवारपासून करावी व सकाळ किंवा संध्याकाळची वेळ निश्चित करावी शक्य असल्यास सकाळची वेळ निश्चित करावी. ही सेवा करत असताना आपल्याला चार गोष्टी करायचे आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र एक वेळेस म्हणायचा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे श्रीसुक्ता चे एक वेळा वाचन करायचे आहे. स्वामी जत्रा चे प्रमोशन रोज तीन अध्याय सात दिवसांमध्ये एक पारायण झाले तर पुन्हा दुसर्या दिवसापासून तीन अध्यायाचे वाचन सुरू करायचे आहे.
ज्यांना स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करणे जमत नाही. त्यांनी किमान एक तरी स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा त्यानंतर तारक मंत्र व श्री सूक्त चे वाचन करावे. ही सेवा आपल्याला सलग एकवीस दिवस करायचे आहे. ही सेवा साधी आणि सोपी आहे. ही सेवा आपण जर मनोभावाने श्रद्धेने जर केली तर या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळेल.
ही सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी धंदा व्यवसाय यामध्ये बरकत मिळेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी सर्व काही मिळेल. आणि आपल्या मनातील सर्व इच्छा देखील ही 21 दिवसांची सेवा केल्याने पूर्ण होतील. ही सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आहे. म्हणजे याचे फळ आपल्याला लवकर मिळेल.
मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.