नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
घरात जर खूप कटकटी होत असतील किंवा खूप भांडण होत असतील तर तुम्ही सुद्धा हा एक तोडगा करा याने घरात सुख-शांती नांदेल घरातील प्रत्येक सदस्य हा सुखी होईल आणि समाधानी होईल आणि मित्रांनो जेव्हा आपल्या घरामध्ये खूप कटकटी किंवा भांडण होत असतात तर अशा वेळेस त्या घराचे सगळ काही विस्कळीत होत असत. काहीच काम व्यवस्थित होत नसतात आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास देखील होत नाहीत. तिथे पैसा सुद्धा टिकत नाही आणि मग अशा घरांमध्ये नकारात्मकता आणि वाईट शक्ती वास करतात. यामुळे अनेक दोष निर्माण होतात, रोग निर्माण होतात आजार वाढतात.
परंतु मित्रांनो जर माणसाचे ग्रह बदलले कि नशीब बदलायला वेळ लागत नाही. ग्रहांचे रशिपरिवर्तन हे माणसाला कधी सुख तर कधी दुःख देत असतात . कधी कधी असे वाटते कि आता आपण हरलो आहोत , कसलीच शक्ती , हिम्मत नाही राहिली काही करायची , एकदम सगळे सोडून द्यायची इच्छा होते तेव्हा फक्त श्री हनुमान ला शरण जा.मित्रानो मंगळवार हा श्री हनुमानांचा दिवस असतो. त्यादिवशी हनुमानाच्या मंदिरात गेलात किंवा हनुमान चालीसा चा पाठ केलात तर बजरंगबली तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील.
आणि जे काही संकटे आहेत त्यांना सामोरे जायची शक्ती देतील किंवा दूर सुद्धा करतील.चला तर पाहुयात मंगळवारी कोणता साधा उपाय केल्याने धन संपत्ती च्या बाबतीत असलेल्या समस्या दूर होऊन सुख समृद्धीचे दिवस येतील आणि या साठी तुम्हाला लागणार आहे कापराची एक छोटी वडी आणि एक लवंग . हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चना केली जाते , लोकांचा खूप विश्वास आहे , अगदी मनोभावे ते पूजा करतात . पूजा करत असताना किंवा कोणतेही धार्मिक कार्य करत असताना कापूर हा लागतोच . खूप महत्वाचा घटक आहे हा.
मित्रांनो असे मानले जाते कि रोज कापूर घरामध्ये किंवा उंबरठ्यावर दोन्ही बाजूने जाळला कि नकारात्मक गोष्टी घरात प्रवेश करत नाही आणि मित्रांनो धन राहत नसेल किंवा विनाकारण पैसा खर्च होत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. जेव्हा संध्याकाळी तुम्ही घरामध्ये देवपूजा करत असाल, मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. जर तुमच्यावर कापूर नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये २ लवंग टाकून पूर्ण घरामध्ये तो दिवा फिरवायचा आहे.
आणि जर कापूर असेल तर एका ताटली मध्ये कापूर घेऊन २ लवंग ठेवून ते जाळायचे आहे आणि देवाची आरती करायची आहे. देवांना त्याने ओवाळायचे आहे आणि पूर्ण घरामध्ये दाखवायचे आहे. हा उपाय केल्याने धन संपत्ती वाढेल आणि आर्थिक समस्या दूर होईल आणि आपल्या ज्योतिषशास्रानुसार मंगळवार च्या दिवशी चांदीच्या ताटामध्ये कापूर आणि २ लवंग जाळले तर त्या घरामध्ये कधीच पैसाची कमी नसते. तिजोरीमध्ये पैसा अगणित वाढत जातो. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आर्थिक समस्या नष्ट होतात.घरामधून दरिद्री नष्ट होते.
सुख व शांतीसाठी, गरिबी दूर करण्यासाठी , कोणी तुमच्या रागावले असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय करताना तुमच्या मनातील इच्छा तुम्ही बजरंगबली समोर बोलून दाखवा . तसेच अजून एक गोष्ट म्हणजे अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूरचे तेल टाकले तर ते खूप भाग्यशाली मानले जाते.जर नशीब साथ देत नसेल तर हा उपाय मंगळवार पासून सुरु करा.काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल.
जर घरामध्ये खूप भांडणे होते असतील, सतत वाद विवाद होत असतील , शांती ,समाधान नसेल तर कापराची एक वडी तुपामध्ये बुडवून जाळायची आहे आणि पूर्ण घरामध्ये ते फिरवायचे आहे.यामुळे घरामध्ये होणारे वाद बंद होतील .वास्तुदोष असेल तर देवघरामध्ये हा कापूर ठेवावा त्याने वास्तुदोष निघून जाईल आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.