नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो अमावस्या दर महिन्यात येत असते. मग महिन्यात येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या का म्हणायचे. असा प्रश्न तुम्हा सर्वाना येत असेल. येत्या सोमवारी येणारी अमावस्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवारी येणाऱ्या समावस्याला खुप मोठे महत्त्व आहे शास्त्रात आणि उपासने मध्ये. या दिवशी जर काही सोपे उपाय केले तर तत्याचे खुप चांगले लाभ आपल्याला मिळतात आणि मित्रांनो सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सोमवारी जी अमावस्या येणार आहे तिची सुरुवात हि रविवारी दुपारी ३ नंतर आहे. तसेच सोमवती अमावस्याची समाप्ती हि सोमवारी सायंकाळी पाच वाजता आहे, सोमवती अमावस्या निमित्य जे काही आराधना करायची आहे. उपासना करायची आहे ती पाच पर्यंतच करायची आहे. मानतील इच्छा उपरणं होत नसतील, व्यवसायात अडचणी येत असतील, घरातील प्रत्येक कार्यात अडचणी येत असतील तर या दिवशी महादेवाची उपासना आणि आराधना करावी.
आणि त्याच गुरु मित्रांनो या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आणि कपडे परिधान करून आपल्या घरा जवळ असलेल्या श्री महादेवाच्या मंदिरात जाऊन आराधना आणि उपासना करावी. महादेवाला पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करावा तसेच बेल पत्र अर्पण करून महादेवाचं जप कमीत कमी एक माळ आणि जर का शक्य असेल तर पाच किंवा अकरा माळ जप करावा. महादेवाचा जप ओम नमो शीवाय नमः मंत्र जप नक्की करावा. मित्रांनो अशा पद्धतीने भगवान महादेवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आणखीन एक उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे.
मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आणि भगवान शंकरांची कृपादृष्टी आपल्यावर राहावे यासाठी आपल्याला या दर्श अमावस्या च्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी देवपूजा करत असताना स्वच्छ हात पाय देऊन तुम्हाला सर्वात आधी देवघरामध्ये बसायच आहे आणि त्यानंतर तुमची विधिवतपणे जी काही सकाळी किंवा संध्याकाळी ची पूजा असेल ती तुम्हाला आधी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कालभैरवाष्टक हे एक स्तोत्र या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी वाचायचे आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या बोटीमध्ये कालभैरवाष्टक दिलेले आहे आणि मित्रांनो जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पुस्तक नसेल तर तुम्ही हे पुस्तक तुमच्या घराजवळ असणाऱ्या पूजेच्या साहित्याच्या दुकानातून किंवा स्वामी समर्थाच्या केंद्रांमधून आणू शकता मित्रांनो या पुस्तकांमध्ये दिलेले कालभैरव अष्टक तुम्हाला या सोमवती अमावस्येच्या दिवशी काहीही करून वाचायचेच आहे कारण मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आणि त्याच बरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व वाईट गोष्टी नष्ट होतात म्हणूनच या आदर्श सोमवती अमावस्या च्या दिवशी तुम्ही कालभैरव अष्टक नक्की वाचा यामुळे तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नक्की नांदेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.