नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो शनि जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. यावेळी ही जयंती ३० मे रोजी येत आहे. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. तसेच शनि साडेसती आणि शनि धैयाच्या वाईट प्रभावापासून आराम मिळतो. या दिवशी शनिदेवासह हनुमानाचीही पूजा केली जाते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या अमावास्येला आपण तीन अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा. हे तीन उपाय आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा घालवतात आणि आपल्या घराच शुद्धीकरण घडवून आणतात. ज्या लोकांचे जीवनामध्ये संतान प्राप्तीचे योग नाही. विवाह कार्यामध्ये बाधा येतात. प्रॉपर्टी किंवा घरासंबंधी काही अडचणी आहेत. घरामध्ये वाद विवाद होतात. मुलांचा काही समस्या आहे घरात कोणी काही केलेला आहे. एखादी बाद आहे अशी जर तुम्हाला शंका असेल.
तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि आपण जे काही काम करता त्या कामात यश मिळण्यासाठी त्या कामातून पैसे मिळण्यासाठी व मोठ्या प्रमाणात प्राप्त करण्यासाठी हे उपाय करायचे आहे. हे उपाय तुम्ही जो काही उद्योग धंदा व्यवसाय करत आहात त्या प्रत्येकामध्ये बरकत निर्माण करतात.
उपाय करायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी बरोबरच शनी देवता ही आपल्यावर प्रसन्न होतील. त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळेल शास्त्रानुसार जो व्यक्ती हा उपाय करतो दीर्घायुष्य बनतो व त्याचा वंश वाढतो. पिंपळाच्या झाडा मध्ये अनेक औषधी गुण आहेत पुराणानुसार पिंपळाचे झाड कापणे हे वर्जित मानले गेले आहे त्यामुळे जे काही पाप लागते ते कोणत्याही प्रायश्चित्त ने जात नाही त्यामुळे चुकूनही पिंपळाचे झाड आपण तोडू नये आणि आपल्या घराच्या जवळ पिंपळ असावा पण लांबच्या अंतरावर असावा.
आणि त्या पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर पडता कामा नये आणि म्हणूनच लोक पिंपळाचे झाड आपल्या घराच्या जवळ लागत नाही पिंपळाच्या झाडाची सावली जर आपल्या घरावर पडली तर यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा पिंपळाचे झाड लावायचा असेल तर ते घरापासून लांब लावा. मित्रांनो तीस मेला म्हणजेच शनि जयंतीच्या दिवशी आपल्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे असा तुपाचा दिवा लावल्यानंतर आपली दरिद्रता दूर होईल आपल्या घरांमध्ये माता लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी चालत येईल.
आणि त्याच्यावर मित्रांनो शनि जयंतीच्या दिवशी आपण जर अगदी मनापासून आणि श्रध्देने हा उपाय केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही माता लक्ष्मीची पावलं बरोबर आपल्या घरामध्ये येईल आणि घरांमधील कटकट साडेसाती अडचणी काळी जादू काही इडापिडा असतील तर त्या निघून जातील आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल यासाठीच मित्रांनो शनि जयंतीच्या दिवशी आपलं घराशेजारील किंवा कुठेही पिंपळाचे झाड असेल येथे तुपाचा दिवा नक्की लावा. हा उपाय मनोभावे करा, तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन घरामध्ये सुख नांदेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.