नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यापैकी कर्ज काढण्याची इच्छा कोणाचीच नसते. मात्र कधी कधी आपली मजबुरी असते. आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं. नंतर परिस्थिती अशी होते की आपल्याला वेळेवर हप्ते पण भरता येत नाही. हळू हळू कर्जाचा डोंगर होतो. काय करावे हे सुचत नाही. स्वामी समर्थांनी कर्ज संबंधी सांगितलेल्या काही गोष्टी पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ म्हणतात की मंगळवारचा दिवस कर्ज काढण्यासाठी कधीच पकडू नये.
कारण मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी घेतलेले कर्ज लवकर फिटत नाही. कर्ज घेण्यासाठी मंगळवारचा दिवस अशुभ आहे. कर्जाचे हफ्ते चुकवण्यासाठी आपण मंगळवारचा दिवस निवडा. कर्ज खूप लवकर उतरते. शुक्रवार सुद्धा कर्ज फेड करण्यासाठी शुभ मानला जातो. तुम्ही जर कर्ज घेतले आहे आणि त्यातील थोडी रक्कम परत करा. म्हणजे तुम्ही जर एक लाख रुपये कर्ज घेतले आहे. तर त्यातील चार पाच हजार रुपये तरी लगेच परत करा.
त्यामुळे कर्ज लवकर फिटते आणि जोतिष शास्त्रात श्री गणेशना कर्ज मुक्ती साठी अत्यंत मोठ महत्व दिलेले आहे आणि रोज जी व्यक्ती श्री गणेशांचे मनोभावे पूजा करते. आणि श्री गणेशाच्या पूजे मध्ये अक्षद आणि दुर्वांचा वापर करते त्या व्यक्तीचे कर्ज लवकर उतरते. श्री गणेशा प्रमाणे हनुमंताचे मनोभावे विधिवत दर मंगळवारी पूजा करा. दर मंगळवारी प्रसाद सोबत हनुमंताना दोन लवंग अर्पण करा.
त्यामुळे कर्ज लवकर फेडले जाते, आणि त्याच बरोबर आपल्या शास्त्रानुसार मसूर सुध्दा कर्ज फेडण्यासाठी वापरात येते. लाल मसुरची डाळ गरिबांना दान करावी. समोरची व्यक्ती ही गरजू असायला हवी. त्यामुळे सुध्दा कर्जातून लवकर मुक्तता होते. आपण कोणताही यातील एक उपाय किंवा एका पेक्षा जास्त उपाय करू शकता. श्री स्वामी समर्थ म्हणतात बुधवारी पैसे कोणालाही उधार देऊ नये.
बुधवारी उधार दिलेले पैसे परत येत नाहीत. हे पैसे बुडतात किंवा या पैशाची वसुली करण्यास त्रास होतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात की गुरुवार हा पैसे देण्यासाठी अत्यंत शुभ आहे. जर तुम्ही गुरुवारी एखाद्या व्यक्ती ला पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची हमी असते. लाल गुलाब कर्ज फेडण्यास मदत करतो. पाच गुलाबाची फुलं घ्यावी सुकलेली नसावी. प्रत्येक पाकळी असावी.
ती फुल घेऊन आपल्या देव्हाऱ्यासमोर बसावे. आणि गायत्री मंत्राचा एक वेळा किंवा 108 वेळा जप करावा. आणि ही पाच फुलं आहेत ती आपल्या जवळच्या पाण्याच्या स्त्रोत मध्ये प्रवाहित करा. मग तो स्त्रोत म्हणजे नदी असेल, ओढा असेल, किंवा एखादं सरोवर असेल शक्यतो पाणी वाहत असावं. जर वाहत पाणी तुमच्या जवळ पास नसेल तर मोठ्या भांड्यात पाणी भरून घ्या आणि त्यात ती गुलाबाची फुलं टाका आणि हे पाणी आपण कोणत्याही झाडाच्या बुंध्याशी टाकू शकता. ती फुल सुध्दा त्या झाडाच्या बुंध्याशी टाकू शकता. हा उपाय सुध्दा कर्ज मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणत केला जातो.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.