नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
आपल्याला जर का केस गळती होत असेल तर त्यामागे भरपूर कारणे असतील जसे सगळ्यात मुख्य कारण अनुवंशिक असू शकते जर का तुमच्या वडिलांचे केस खूप कमी वयात गळायला सुरुवात झाली. आणि याचा मानसिक त्रास सहन करायचा नसेल तर आजचे काही मुद्दे लक्षात घ्या.
पण आपण तो केस गळतीचा कालावधी पुढे नेऊ शकतो एक उपाय करून तो मी तुम्हाला सांगणार आहे व तो कुठलाही साइड इफेक्ट करत नाही कारण तो एक आयुर्वेदिक व नैसर्गिक उपाय आहे यात फक्त दैनंदिन जेवणातील काही छोटे बदल आपल्याला करायचे आहे.
पहिली चूक जी आपण करतो ती आहे जास्त तापमान असलेल्या पाण्याने आपले केस धुणे म्हणजे थंडीच्या दिवसात भरपूर लोक खूपच गरम पाण्याने अंघोळ करतात अगदी चटके लागेपर्यंत आणि तेच पाणी आपल्या केसांवर वापरतात त्याने होते असे आपल्या डोक्यावरील जे कातडं असते ज्यावर आपल्या केसांची मुळे असतात त्यांना हे सहन होत नाही व ते मूळ ढीली करू लागतात व मुळे मजबूत नसल्याने ती तुटू लागतात.
आपण भरपूर वेळा पाहिले असेल अंघोळी नंतर जेव्हा आपण डोकं पुसतो तेव्हा भरपूर केस आपल्याला त्या टॉवेल वर दिसतात ती या कारणांमुळे आणि थोडे केस सगळ्यांचे गळतात त्यामुळे तुम्ही घाबरु नका आणि त्याठिकाणी जर का नवीन केस येत नसतील तर तो मूळ मुद्दा आहे. जर तुमचे केस फक्त गळत असतील आणि त्याठिकाणी दुसरे केस येत नसतील तर तो एक मोठा प्रश्न केसगळती चां तुम्हाला भविष्यात उद्भवू शकतो.
दुसरे कारण म्हणजे तुम्ही दररोज वापरात घेत असाल तो कंगवा जो तुम्ही केस विंचरण्यास कामीं येतो आता मुद्दा तो नाही पण एक मूळ मुद्दा म्हणजे तुम्ही वापरत असलेला प्लास्टिक चा कंगवा हा मूळ तुम्हाला प्रॉब्लेम आहे. प्लास्टिक आणि आपली केस मिळून एक स्टाटिक चार्ज निर्माण करतात व त्याने केसांच्या मुळात रक्ताभिसरण होण्यास प्रॉब्लेम निर्माण होते.
यासाठी तुम्ही थोडे पैसे खर्च करा बाजारातून काचेचा किंवा लाकडी कांवा विकत घ्या आणि त्याचा दैनंदिन वापर करा आणि जर तुम्हाला लिंबाच्या लाकडापासून बनविलेला कंगवा जर भेटला तर अती उत्तम सोन्याहून पिवळ होईल त्याने तुमच्या डोक्यावरील केसांच्या मुळांना व्यवस्थित प्रमाणे रक्ताभिसरण होईल व केस मजबूत होतील आणि त्यांची वाढ होण्यास मदत होईल भरपूर दाट केस येतील. फक्त या दोन मुद्द्यांचा नीट वापर करा.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.